Extrotion case agains Nashik MNS General Secretary | Sarkarnama

मनसेच्या नाशिक सरचिटणीसावर खंडणीचा गुन्हा

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 12 ऑक्टोबर 2017

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर सरचिटणीस सत्यम खंडाळे यांच्याविरोधात तीन लाख रुपयांची खंडणी मागीतल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात खंडाळे यांना पोलिसांनी ताब्यातही घेतले. त्यामुळे राजकीय पक्षातील वादग्रस्त नेत्यांविषयी पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे.

नाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर सरचिटणीस सत्यम खंडाळे यांच्याविरोधात तीन लाख रुपयांची खंडणी मागीतल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात खंडाळे यांना पोलिसांनी ताब्यातही घेतले. त्यामुळे राजकीय पक्षातील वादग्रस्त नेत्यांविषयी पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी : संतोष शांताराम तुपसाखरे यांनी त्यांच्या वडीलोपार्जीत 18 एकर जमिनीसाठी नाशिकच्या न्यायालयात दावा दाखल केला होता. त्यासाठी त्यांनी अॅड. संजय खंदारे यांना वकिल नियुक्त केले होते. या दाव्यावर 1996 मध्ये तुपसाखरे यांच्या बाजुने निकाल आला. तुपसाखरे यांनी वकिल खंदारे यांना दाव्याविषयी संपुर्ण फी अदा केली होती. संबंधीत दाव्याविषयी त्यांना एक कोटी दहा लाख रुपयांत समझोता करुन संबंधीत खटल्यात 12 डिसेंबर, 2015 रोजी लोक अदालतीत वाद मिटवला. अॅड. खंदारे यांचे वकिलपत्र काढुन घेतले. अॅड. खंदारे यांनी या खटल्यात तुपसाखरे यांना मोठी रक्कम मिळाल्याने तीस लाखांची मागणी केली. पैसे न दिल्यास तुला खोट्या गुन्ह्यात अडकवू अशी दमबाजी सुरु केली. 13 सप्टेबर, 2017 रोजी 12.09 वाजता तुपसाखरे त्यांच्या घरी असतांना मनसेचे शहर सरचिटणीस सत्यम खंडाळे यांनी अॅड. खंदारे यांच्या सांगण्यावरुन तुपसाखरे यांच्याशी मोबाईवरुन संपर्क साधला. 'खंदारे वकिलांनी सांगितल्याप्रमाणे तीन लाख रुपये आत्ताच्या आत्ता माझ्या ऑफीसला आणुन दे. पैसे जमा कर अन्यथा तुझे हात पाय तोडुन टाकीन',  अशी धमकी दिली. यासंदर्भात तुपसाखरे यांनी शहर पोलिस आयुक्तांशी संपर्क साधला. त्यांची भेट घेऊन याबाबतच माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी खंडाळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.

कोण आहेत खंडाळे
सत्यम खंडाळे हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर सरचिटणीस आहेत. अशोक स्तंभ येथील नाशिकचा राजा मंडळाचे ते संस्थापक आहेत. 2014 मध्ये मनसेतर्फे त्यांनी महापालिका निवडणूक लढविली होती. त्यात त्यांचा पराभव झाला. यापूर्वीही त्यांच्यावर विविध गुन्हे दाखल आहेत. शहराच्या माजी आमदारांचे निकटवर्तीय म्हणून ते ओळखले जातात.

संबंधित लेख