Explosive investigation should handled by CID | Sarkarnama

स्फोटके पाठविण्याबाबत एटीएस व सीआयडीने तपास करावा- अजित अभ्यंकर

यशपाल सोनकांबळे
सोमवार, 8 मे 2017

बॉम्ब पाठविणा-या संघटनांचा निषेध करते. जात, भाषा आणि धर्माच्या नावावर फुट पाडली जात आहे. जागतिकीकरणाच्या दुष्परिणामाविरोधात डाव्या पुरोगामी शक्तींची एकजुट होऊ नये यासाठी हा प्रकार जातीयवादी संघटनांकडून केला जात आहे.- किरण मोघे

पुणे - एखाद्या कार्यालयावर स्फोटके पाठविणे हा किरकोळ स्थानिक गुन्हा नसुन राजकीय दहशतवादी घटना आहे. त्यामुळे याचा तपास दहशतवादविरोधी पथक (एटीएस) आणि सीआयडीकडे सोपवावा, अशी मागणी कम्युनिस्ट नेते अजित अभ्यंकर यांनी सोमवारी पुण्यात केली.

काही दिवसांपूर्वी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयात टपालाद्वारे स्फोटके पाठविण्याची घटना घडली होती. याचा तपास स्थानिक पोलिसांकडे देण्यात आला आहे. याबाबत आजविधानभवन मुख्य प्रवेशद्वारासमोर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि सेंटर ऑफ ट्रेड युनियन्स (सिटू) यांच्या वतीने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवाराविरोधात धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी किरण मोघे, नाथा शिंगाडे, इंटकचे अध्यक्ष कैलास कदम, वसंत पवार, एड. म.वि.अकोलकर आदी उपस्थित होते.

यावेळी किरण मोघे म्हणाल्या, ''बॉम्ब पाठविणा-या संघटनांचा निषेध करते. जात, भाषा आणि धर्माच्या नावावर फुट पाडली जात आहे. जागतिकीकरणाच्या दुष्परिणामाविरोधात डाव्या पुरोगामी शक्तींची एकजुट होऊ नये यासाठी हा प्रकार जातीयवादी संघटनांकडून केला जात आहे.'', यावेळी शिष्टमंडळाकडुन जिल्हाधिकारी सौरभ राव यांना निवेदन सादर करण्यात आले.

संबंधित लेख