expel subhash deshmukh : nirupam | Sarkarnama

सुभाष देशमुख यांची मंत्रिमंडळातून  हकालपट्टी करा : संजय निरुपम 

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 3 डिसेंबर 2018

मुंबई : सहकारमंत्री सुभाष देशमुख यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टीची मागणी काॅंग्रेसने आज केली. देशमुख यांच्या संस्थेला अनुदान देण्यासाठी बनावट कागदपत्रे केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपचा कारभार पारदर्शक असल्याचा दावा केला जात आहे. या सरकारमध्ये भ्रष्टाचाराला थारा नाही, भ्रष्टाचार सहन केला जाणार नाही; परंतु त्यांच्याच मंत्रिमंडळातील सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराची प्रकरणे सिद्ध झालेली असतानाही ते अजून मंत्रिमंडळात कसे काय, असा सवाल मुंबई प्रदेश काॅंग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांनी केला. 

सुभाष देशमुख यांच्याच लोकमंगल मल्टिस्टेट को- ऑप सोसायटीने बनावट कागदपत्रे बनवून मोठा भ्रष्टाचार केल्याचे उघड झाले असून, देशमुख यांची तातडीने मंत्रिमंडळातून हकालपट्‌टी करा, अशी मागणी मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केली आहे. देशमुख यांचा हा भ्रष्टाचार कॉंग्रेसने पत्रकार परिषद घेऊन बाहेर काढला होता, असे संजय निरुपम म्हणाले. 

संबंधित लेख