Ex Prime Minister Manmohan Singh keeps mum | Sarkarnama

त्या प्रश्‍नावर माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी वापरले मौनाचे हत्यार 

सरकारनामा
शुक्रवार, 28 डिसेंबर 2018

.

नवी दिल्ली : माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग हे त्यांच्या मौनामुळे प्रसिद्ध आहेत. कोणत्याही विषयावर ते लवकर बोलत नाहीत, प्रतिक्रिया देत नाहीत अशी टीका त्यांच्यावर होत असे. परंतु डॉ. मनमोहन सिंग हे टिकेविरुद्ध मौनाचा वापर एखाद्या शस्त्राप्रमाणे करतात आणि टीकाकारालाच घायाळ करतात याचा प्रत्यय शुक्रवारी पुन्हा एकदा आला.

डॉ. मनमोहन सिंग कॉंग्रेस पक्षाच्या 134 व्या वर्धापनदिनानिमित्त कॉंग्रेस कार्यालयात दाखल झाले तेव्हा त्यांच्याभोवती पत्रकारांचा गराडा पडला. डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर 'द ऍक्‍सिडेंटल प्राय मिनिस्टर' हा चित्रपट बनलेला आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरवर तुमची प्रतिक्रिया काय? तुमच्यावर जो चित्रपट बनवला आहे, त्याविषयी तुमचे मत काय? असे प्रश्‍न पत्रकारांनी त्यांना विचारले.

देशाचे अर्थमंत्रिपद आणि रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नरपद भूषविलेल्या डॉ. मनमोहन सिंग यांनी या प्रश्‍नावर मौन राखीत कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही किंवा चेहऱ्यावर कोणतेही भाव व्यक्त केले नाहीत. शेवटी त्यांना प्रश्‍न विचारणारे पत्रकार खजील होऊन त्यांच्यापासून दूर निघून गेले. विद्वान माणसे वादात पडण्यापेक्षा मौन कसे धारण करतात याचाच हा एक वस्तुपाठ होता . 

या चित्रपटात अनुपम खेर हे माजी पंतप्रधानांच्या भूमिकेत आहेत. हा चित्रपट येत्या 11 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.

संबंधित लेख