ex mp sarode dies at 78 | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

हेमामालिनी या मथुरा येथून निवडणूक लढविणार
नरेंद्र मोदी वाराणशीतून, अमित शहा हे गांधीनगरमधून, नितीन गडकरी नागपूरमधून आणि राजनाथसिंह हे लखनौमधून निवडणूक लढविणार

माजी खासदार डॉ. गुणवंतराव सरोदे यांचे जळगावात निधन 

सरकारनामा ब्यूरो
रविवार, 2 डिसेंबर 2018

सावदा : भाजपचे ज्येष्ठ नेते महाराष्ट्र प्रदेश भाजपचे माजी उपाध्यक्ष व माजी खासदार डॉ. गुणवंतराव रामभाऊ सरोदे (वय 78) यांचे आज अल्प आजाराने निधन झाले. मेंदूत रक्तस्राव झाल्यामुळे त्यांच्यावर गेल्या पाच दिवसांपासून जळगाव येथे उपचार सुरू होते. आज दुपारी त्यांची प्राणज्योत मावळली. रावेर रस्त्यावरील भर्तिक बुवा मंदिराजवळील त्यांचे शेतात त्यांच्यावर आज दुपारी चारला अंत्यसंस्कार करण्यात आले. 

डॉ. सरोदे हे जनसंघपासून भाजपचे एकनिष्ठ कार्यकर्ते होते. रावेर मतदारसंघाचे ते 1985 ते 1990 आमदार होते. त्या वेळी उत्तर महाराष्ट्रात भाजपचे ते एकमेव आमदार निवडून आले होते. जळगाव लोकसभा मतदारसंघाचे 1991 पासून सतत दोन वेळा खासदार होते. भाजप जिल्हाध्यक्षासह त्यांनी विविध पदे भूषविली व नेहमी स्वच्छ व तत्त्वनिष्ठ राजकारण केले. 

सरोदे यांच्या निधनाने समर्पित भावनेने काम करणारा एक ज्येष्ठ कार्यकर्ता गमावल्याची भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतात, डॉ. सरोदे हे जनसंघापासूनचे ज्येष्ठ कार्यकर्ते होते. भारतीय जनता पार्टीचे फारसे उमेदवार निवडून येत नसण्याच्या काळात जळगाव-रावेर परिसरात पक्षाची पाळेमुळे रूजविण्यात त्यांनी अतिशय मोलाचे योगदान दिले. सर्वसामान्य कार्यकर्त्यांशी अफाट जनसंपर्क आणि आपल्या विचारांप्रती निष्ठा ही त्यांची वैशिष्ट्ये होती. त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
 
संबंधित लेख