ex mp nivedita mane strongly opposes raju shetty | Sarkarnama

पवारांनी सांगितलेतरी शेट्टींना पाठिंबा नाही, धैर्यशील 'शिवधनुष्य' उचलणारच!

संपत मोरे 
सोमवार, 26 नोव्हेंबर 2018

पूर्वी माने गटाने कोल्हापुरात इतिहास घडवला आहे, जितका संघर्ष त्यांच्या वाटयाला येतो त्यावर मात करत माने गट इतिहास घडवतो  

- निवेदिता माने, माजी खासदार

पुणे : "माने गट हा संघर्षातून उभा राहिलेला आहे. आमचा कार्यकर्ता लढाऊ आहे. याच कार्यकर्त्यांच्या बळावर धैर्यशील माने राजकीय शिवधनुष्य उचलणार आहेत," असे माजी खासदार निवेदिता माने यांनी सांगितले. 

शिवधनुष्य उचलणार म्हणजे शिवसेनेत जाणार काय ? असे विचारताच त्या म्हणाल्या ,"मी शिवधनुष्य म्हणतेय लक्षात घ्या."

हातकणंगले लोकसभा मतदारसंघातुन लोकसभेसाठी शरद पवार यांनी खासदार राजू शेट्टी यांच्या नावाला हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे निवेदिता माने नाराज आहेत. परवा एका कार्यक्रमासाठी पवार मानेंच्या गावी रूकडीत येऊन गेले त्यावेळी माने यांनी त्या कार्यक्रमाला जाणे टाळले.

शेट्टी यांची दिवसेंदिवस पवारांशी वाढणारी जवळीक माने गटासाठी डोकेदुखी ठरत आहे. याबाबत माने यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या," शरद पवार यांच्यावर मी कशाला नाराज होऊ? ते आमचे श्रद्धास्थान आहेत. त्यांच्यावर आमच्या निष्ठा आहेत, मात्र लोकसभा निवडणुकीत त्यांनी जर राजू शेट्टी यांना पाठींबा दिला तर आम्ही शेट्टी यांचा प्रचार करणार नाही. धैर्यशील माने लोकसभा निवडणूक लढतील. ते कोणाचंच ऐकणार नाहीत. "
 

 

संबंधित लेख