ex mp nivedita mane about dhairysheel mane's career | Sarkarnama

राष्ट्रवादीने विरोधकांना बळ दिले, त्यामुळे धैर्यशील यांनी घेतलेला निर्णय योग्य!

संपत मोरे
गुरुवार, 29 नोव्हेंबर 2018

मी आता काहीही राजकीय भाष्य करणार नाही, पण लवकरच बोलेन! 

पुणे : "धैर्यशील माने यांनी घेतलेला निर्णय योग्य आहे. क्षमता असूनही संधी नाकारली जात असेल तर ते तरी काय करणार? अजून काही राजकीय बोलणार नाही पण वेळ आल्यावर नक्कीच बोलेन, "असं राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी खासदार निवेदिता माने यांनी सांगितले.

माने यांचे सुपूत्र धैर्यशील माने यांनी काल शिवसेनेत प्रवेश केला. त्याचवेळी निवेदिता माने यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा दिला. याबाबत माने यांनी प्रतिक्रिया दिली.

"आमच्या मतदारसंघात परिवर्तनाची लाट आलेली असताना राष्ट्रवादी काँग्रेसकडून मात्र आमच्या विरोधकांना बळ देण्याचा प्रयत्न सुरू होता. हे आमच्या गटातील लोकांना रुचले नाही. त्यामुळे लोकांचा, कार्यकर्त्यांचा विचार घेऊनच धैर्यशील माने यांनी शिवसेनेत जायचा निर्णय घेतला आहे. त्यांचा निर्णय योग्य आहे. ते मतदारसंघात इतिहास घडवतील."असा विश्वास माने यांनी व्यक्त केला. 
 

टॅग्स

संबंधित लेख