आनंद दिघेंना बाळासाहेब ठाकरेंनी संपवलं : नीलेश राणे

निगम, ठाकरे घराण्याचे काय नाते होते. कर्जतच्या फार्महाऊसवर कोण-कोण गेले, हे सांगायला कमी करणार नाही.
आनंद दिघेंना बाळासाहेब ठाकरेंनी संपवलं : नीलेश राणे

रत्नागिरी : नारायण राणे हे माझ्यासाठी साहेब आहेत. त्यांच्यावर कोणी गटरछाप खासदार आणि डांबर चोर आमदार जाहीर टीका करत असेल तर आम्हाला बाळासाहेब ठाकरेंची खरी परिस्थिती जाहीर सभेतच उघड करावी लागेल, असे सांगत स्वाभिमानचे सरचिटणीस, माजी खासदार नीलेश राणेंनी शिवसेनेवर निशाणा साधला. 

आनंद दिघेंना कसं संपवल?, सोनु निगमना मारायचे आदेश बाळासाहेबांनी कसा दिला? हे जाहीर करु, असा इशारा त्यांनी दिला.

वाटदमधील शिवसेनेच्या सभेत खासदार राऊतांनी राणेंवर नऊ मर्डर केल्याचा ठपका ठेवला. त्याला नीलेश यांनी पत्रकार परिषदेत सणसणीत उत्तर दिले. ते म्हणाले, "दहा वर्षातील साडेचार वर्षे गृहखाते शिवसेनेकडे आहे. मग तपास का नाही केला? आम्ही मर्यादा पाळली, बाळासाहेबांबद्दल बोललो नव्हतो. राणेंवर गटरछाप खासदार बोलले तर आम्ही ऐकून घेणार नाही. आनंद दिघेचे काय झाले? कट कसा रचला गेला? त्यांचा मृत्यू हॉस्पिटलमध्ये कसा दाखवला गेला? ज्या दोन शिवसैनिकांना हे सहन झाले नाही, त्यांना बाळासाहेबांच्या आदेशावरुन कसे संपवले गेले? हे जाहीर करावे लागेल. खासदार राऊतांनी औकादीत राहावे. आतापर्यंत ठाकरे घराण्यामध्ये कधी शिरलो नव्हतो. ठाकरे घराण्याला वाचवायचे असेल, तर आजच सावध व्हा.' 
ते म्हणाले, "निगम, ठाकरे घराण्याचे काय नाते होते. कर्जतच्या फार्महाऊसवर कोण-कोण गेले, हे सांगायला कमी करणार नाही. राणे नेहमीच फ्रंटफुटवर खेळतात. इतिहासात जायचे असेल तर इतिहास दोन्ही बाजूचा असतो. आम्हाला ठाकरे घरण्याचे सत्य सांगावे लागले. जयदेव ठाकरे न्यायालयात बोलले ते सांगायला लावू नका. ते सांगितले तर अंगावर कपडे राहणार नाहीत.' 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com