ex mp laxmanrao patil in icu | Sarkarnama

साताऱ्याचे माजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांची प्रकृती चिंताजनक

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 11 डिसेंबर 2018

सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. 

सातारा :  राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते, माजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर येथील प्रतिभा हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत, अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली.

गेल्या काही वर्षांपासून माजी खासदार लक्ष्मणराव पाटील हे पार्किन्सन आजाराने त्रस्त होते. दोन दिवसांपूर्वी पहाटे त्यांना अचानक रक्तस्त्राव झाला. त्यामुळे त्यांना साताऱ्यातील  प्रतिभा हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. 

श्री. पाटील यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी व त्यांना पाहण्यासाठी  कार्यकर्त्यांची हॉस्पिटलमध्ये रीघ लागली आहे.  त्यांची प्रकृती लवकर  सुधारावी यासाठी कार्यकर्ते प्रार्थनाही करत आहेत.  

टॅग्स

संबंधित लेख