कर्जत-जामखेडचे माजी आमदार विठ्ठलराव भैलुमे यांचे निधन

कर्जतच्या नगराध्यक्षा प्रतिभा भैलुमे यांचे विठ्ठलराव हे सासरे होत.
कर्जत-जामखेडचे माजी आमदार विठ्ठलराव भैलुमे यांचे निधन

कर्जत (नगर) : कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार विठ्ठलराव सहादू भैलुमे (वय ८४ ) यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी कमलाबाई, राजेंद्र, प्रताप व नंदकिशोर ही दोन मुले, अरुणा ही मुलगी असा परिवार आहे. 

कर्जतच्या नगराध्यक्षा प्रतिभा भैलुमे यांचे विठ्ठलराव हे सासरे होत.
विठ्ठलराव भैलुमे यांचा जन्म १ आॅक्टोर १९३४ रोजी झाला. १९७० साली त्यांनी स्थानिक राजकारणात प्रवेश करून मागासवर्गीय फार्मिंग सोसायटीचे अध्यक्षपद भुषविले. १९९० मध्ये त्यांना काँग्रेसकडून कर्जत-जामखेडची उमेदवारी मिळाली. त्यात ते विजयी झाले. तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांचे ते खंदे समर्थक म्हणून ओळखले जायचे. आमदारकीच्या काळात त्यांनी कर्जत शहराला खेडमधून पाणी पुरवठा योजना आणली. जामखेड शहरासाठी भुतवडा पाणी पुरवठा योजना दिली. कर्जल व जामखेडमध्ये २४ बंधारे त्यांच्याच काळात झाले. हमाल पंचायतची स्थापना, वीज उपकेंद्राची मंजुरी, दूरसंचार विभाग कार्यालय अशी अनेक कामे भैलुमे यांच्या काळात झाली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com