माजी आमदार वसंतराव इटकेलवार यांचे निधन 

उमरेडचे (जि. नागपूर) माजी आमदार वसंतराव इटकेलवार यांचे सोमवारी निधन झाले. ते 85 वर्षांचे होते. ते अपक्ष म्हणून निवडून आले होते, हे विशेष.
माजी आमदार वसंतराव इटकेलवार यांचे निधन 

नागपूर : उमरेडचे (जि. नागपूर) माजी आमदार वसंतराव इटकेलवार यांचे सोमवारी निधन झाले. ते 85 वर्षांचे होते. ते अपक्ष म्हणून निवडून आले होते, हे विशेष. 
 
कॉंग्रेसचे कार्यकर्ते राहिलेले वसंतराव इटकेलवार गोष्टीवेल्हाळ स्वभावामुळे नागपूर जिल्ह्याच्या राजकारणात ओळखले जात होते. उमरेड मतदारसंघातून त्यांनी सातत्याने कॉंग्रेसकडून उमेदवारी मागितली. परंतु त्यांना उमेदवारी मिळत नव्हती. ही माझी अखेरची निवडणूक आहे, अशी हाळी देऊन 1999 मध्ये त्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला. माजी आरोग्यमंत्री डॉ. श्रावण पराते यांच्या विरोधात त्यांनी निवडणूक लढविली. या निवडणुकीत ते निवडून आले. अपक्ष म्हणून निवडून आल्यानंतर त्यांनी विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वातील कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सरकारला पाठिंबा दिला. 

उमरेड मतदारसंघात कोष्टी-हलबा व दलित मतदारांचा प्रभाव असताना सुद्धा त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक जिंकली. अत्यंत साधेपणाने राहणाऱ्या इटकेलवार यांनी सामान्य माणसाचा प्रतिनिधी म्हणून प्रतिमा तयार केली. ग्रामीण ढंगाने गोष्टी करणाऱ्या वसंतराव इटकेलवार यांना नागपूर जिल्ह्याच्या राजकारणात एक वेगळेच स्थान होते.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com