ex mla ramesh thorat criticise rahu kool | Sarkarnama

राहुल कुलांवर हल्याच्या कट रचणारे त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्याचे नातेवाईक!  

संतोष काळे
शुक्रवार, 12 ऑक्टोबर 2018

माझ्यावर साधी पोलीस ठाण्यात एकही एन. सी (अदखल पात्र गुन्हा) पण दाखल नाही.  

राहू (दौंड-पुणे) : आमदार राहुल कुल यांच्यावर हल्याच्या कट रचणारे, त्यांच्या अगदी जवळच्या कार्यकर्त्यांचे नातेवाईक असल्याचा गौप्यस्फोट माजी आमदार रमेश थोरात यांनी केला. 

भांडगाव (ता. दौंड) येथील शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. थोरात म्ह्णाले, मी गेल्या ४५ वर्षांपासून सक्रीय राजकारणात आहे. मी पंधरा वर्ष खुटबावचा सरपंच होतो. तीस वर्ष तालुका व जिल्ह्यातील राजकारणात सक्रीय आहे. या कालावधीत माझ्यावर साधी पोलीस ठाण्यात एकही एन. सी (अदखल पात्र गुन्हा) पण दाखल नाही.  

विरोधक जनतेची दिशाभुल करतात. २५ कोटीचे भूमिगत गटार योजना दौंड शहरात मी केली. शहरात शिवरायांचा अश्वारूढ पुतळा उभा केला. कुल यांच्या बाराशे कोटीचा निधी ही निव्वळ वल्गना आहे.  कुल जनतेची विकासकामांबाबत दिशाभुल करतात. तालुक्यात सुमारे दहा हजार महिला संजय गांधी निराधार योजनेत पात्र ठरल्या असून त्यांना पेन्शन मिळून देण्यात आम्हाला यश आले. उसाला २६५० रूपये बाजारभाव आणि काटा पेमेंटच्या नावाखाली भीमा पाटसच्या सभासदांची दिशाभुल केली. १९६४ रूपये प्रमाणे मला आतापर्यंत उसाचे पेमेंट माझ्या खात्यावर जमा झाले आहेत, असे थोरात म्हणाले.

दरम्यान देलवडी, रोटी, देऊळगाव राजे, वासुंदे, नाथाचीवाडी येथील ग्रामपंचायतीच्या नवनिर्वचित पदाधिका-यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी युवतीच्या अध्यक्षा स्मिता पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, माजी आमदार अशोक पवार, राणी शेळके, वैशाली नागवडे, अप्पासाहेब पवार, अर्चना घारे, मधुकर दोरगे रामभाऊ टुले, नितीन दोरगे, गणेश कदम, वीरधवल जगदाळे, झुंबर गायकवाड, मीना धायगुडे, भाऊसाहेब ढमढेरे, रामदास दोरगे यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.   

संबंधित लेख