ex mla prakash shendage car accident near nasarapur | Sarkarnama

नसरापूर वळणावरील खड्डा प्रकाश शेंडगेंच्या जीवावर उठला होता, पण... 

संपत मोरे 
बुधवार, 5 सप्टेंबर 2018

पुण्याजवळील नसरापूर येथे शेंडगे यांच्या गाडीला अपघात झाला. त्यात शेंडगे यांच्या खांद्याला दुखापत झालीय. गाडीतील त्यांचे सहकारी जखमी झाले आहेत.

"मी सांगलीला निघालो होतो. नसरापूर फाट्याजवळील वळणावर गाडी एका खड्ड्यात गेली. तिथं चिखलात घसरून पलटी झाली. चार वेळा गाडीची पलटी झाली. गाडीचा चालक दरवाजाजवळची काच तुटल्याने बाहेर जाऊन पडला. आम्ही गाडीतच अडकलो. काय झालंय कळायच्या आत हे सगळं झालं. तिथली माणसं गोळा झाली. त्यांनी दरवाजे तोडून आम्हाला बाहेर काढलं, जवळच्या दवाखान्यात नेलं. आमची गाडी चांगली होती म्हणून वाचलो तिथं दुसरी गाडी असती तर काय झालं असत ?' असा सवाल माजी आमदार प्रकाश शेंडगे विचारला. 

पुण्याजवळील नसरापूर येथे शेंडगे यांच्या गाडीला अपघात झाला. त्यात शेंडगे यांच्या खांद्याला दुखापत झालीय. गाडीतील त्यांचे सहकारी जखमी झाले आहेत. त्यांच्या गाडीचा चालक गंभीर जखमी झाला आहे. शेंडगे म्हणाले, "तिथल्या खड्ड्यात गाडी गेल्यानेच अपघात झाला. आमचे नशीब चांगले म्हणूनच वाचलो. 

आमचा उपचार सुरु असतानाच तासाने त्याच ठिकाणी अपघात झाला आहे. मी ज्या डॉकटरांकडे उपचार घेतला आहे,त्यांना जर विचारलं तर तेच सांगतील त्या ठिकाणी आजवर किती अपघात झाले आहेत ? या ठिकाणीच का अपघात होतात याचा विचार आजवर का झालेला नाही ?" असा सवाल त्यांनी विचारला. 

संबंधित लेख