Ex MLA Madhavrao Gaikwad is no more | Sarkarnama

माजी आमदार माधवराव गायकवाड यांचे निधन

संपत मोरे 
सोमवार, 12 नोव्हेंबर 2018

माधवराव गायकवाड यांचं मूळ गाव सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील साखरवाडी. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रेरणेने ते डाव्या पक्षात आले.आणि पक्षाच्या कामासाठी ते मनमाडला स्थायिक झाले.

पुणे : भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे माजी आमदार,मनमाडचे माजी नगराध्यक्ष माधवराव गायकवाड यांचे निधन झाले.

माधवराव गायकवाड यांचं मूळ गाव सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील साखरवाडी. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रेरणेने ते डाव्या पक्षात आले.आणि पक्षाच्या कामासाठी ते मनमाडला स्थायिक झाले.

खंडकरी शेतकऱ्यांच्या ब्रिटिशांनी ताब्यात घेतलेल्या जमिनी परत मिळावा म्हणून राज्यभर जो लढा उभा राहिला त्या लढ्याचे नेते गायकवाड होते.भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव म्हणून त्यानी काम केले होते.स्वातंत्र्यचळवळ,सयूंक्त महाराष्ट्र चळवळीतही ते अग्रभागी होते.

गायकवाड यांच्या ८० व्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांचा सत्कार मनमाडमध्ये आयोजित केला होता.त्यावेळी कार्यक्रमाला विलासराव देशमुख आणि एन डी पाटील उपस्थित होते. यावेळी भाषणात विलासराव देशमुख म्हणाले,"माधवराव गायकवाड आमचे आदर्श आहेत.

"त्यावर बोलताना एन डी पाटील म्हणाले होते,"विलासराव ,तुम्ही इथं अस बोला आणि इथून गेल्यावर माधवराव आयुष्यभर वागले त्याच्या विरोधी वागा."या प्रसंगाची नंतर अनेक दिवस चर्चा झाली होती.

गायकवाड सातारा येथील रिमांड होमचे विश्वस्त होते,त्याच्या मिटींगला ते मनमाडवरून रेल्वेने यायचे.कधी एसटीने यायचे.ते आयुष्यभर अतिशय साधे राहणारे नेते होते.

संबंधित लेख