eX mla dr. kalyanrao kale birthday | Sarkarnama

आजचा वाढदिवस 

sarkarnama
बुधवार, 19 जुलै 2017

माजी आमदार कल्याण काळे (फुलंब्री मतदारसंघ) 
 
डॉ. कल्याण काळे यांच्या राजकीय प्रवासाला औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीने झाली. यावेळी त्यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने दणदणीत विजय मिळवला आणि कल्याण काळे बाजार समितीचे सभापती बनले. कॉंग्रेस पक्षाचे काम करत असताना त्यांनी तालुका व जिल्हास्तरावर विविध पदे भूषवली. 

2004 व 2009 मध्ये दोनवेळा ते फुलंब्री मतदारसंघातून कॉंग्रेसच्या तिकीटावर आमदार झाले. जालना लोकसभा मतदारसंघातून देखील त्यांनी निवडणुक लढवली होती, मात्र त्यांचा थोड्या मतांनी पराभव झाला. फुलंब्री मतदारसंघाचे विद्यमान आमदार व विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या ताब्यातील विविध सहकारी संस्था कल्याण काळे यांनी जिंकत त्यांना जोरदार धक्का गेल्या काही काळात दिला.

फुलंब्री येथील देवगिरी सहकारी साखर कारखाना, खरेदी विक्री संघ, बाजार समिती, औरंगाबाद खरेदी विक्री संघ, औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समिती डॉ. काळे यांच्या पॅनलने जिंकत तिथे सत्ता स्थापन केली. औरंगाबाद लोकसभा व फुलंब्री विधानसभा मतदारसंघातील कॉंग्रेसचे संभाव्य उमेदवार म्हणून त्यांच्या नावाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. 
 
संबंधित लेख