Ex Minister Babanrao Pachpute Gym Workout | Sarkarnama

माजी मंत्री बबनराव पाचपुते जीममध्ये : 2019 ची अशीही तयारी?

संजय आ. काटे
मंगळवार, 2 ऑक्टोबर 2018

श्रीगोंदे विधानसभा मतदारसंघात गेली ३८ वर्षे राजकीय व सामाजीक वलय निर्माण करणाऱ्या पाचपुते यांचा हा व्हिडिओ चर्चेत आहे. सहा टर्म आमदार, अगोदर गृहराज्यमंत्री नंतर वनमंत्री, आदिवासी मंत्री व नगर जिल्ह्याचे पालकमंत्री अशी मंत्रीपदे घेवून आपली व तालुक्याची राजकीय ताकत दाखविणाऱ्या बबनराव पाचपुते यांनी व्यायामाचा दिनक्रम कायम ठेवून तरुणांपुढे आदर्श ठेवला आहे. 

श्रीगोंदे (जि. नगर) : सत्ता असो वा नसो, वय किती झाले, यापेक्षा दररोज सकाळचा व्यायाम करुनच बाहेर पडण्याचे त्यांचा गेली पन्नास वर्षांचा दिनक्रम आहे.... मंत्री होते तरी त्यासाठी तेवढाच वेळ आणि आता आमदारही नाही तरीही व्यायामाची पध्दत तीच ... आता त्यांनी जीममध्ये जाऊन तरुणांना लाजविणारे व्यायामाचे प्रकार करुन आगामी २०१९ च्या विधानसभेसाठी जोरदार तयारी असल्याचेच दाखवून दिले आहे. माजीमंत्री बबनराव पाचपुते यांचा शिरुर येथील जीममधील व्हिडीओ व्हायलर झाला आणि पुन्हा एकदा व्यायामातील त्यांची दादागिरी अधोरेखित झाले. 

श्रीगोंदे विधानसभा मतदारसंघात गेली ३८ वर्षे राजकीय व सामाजीक वलय निर्माण करणाऱ्या पाचपुते यांचा हा व्हिडिओ चर्चेत आहे. सहा टर्म आमदार, अगोदर गृहराज्यमंत्री नंतर वनमंत्री, आदिवासी मंत्री व नगर जिल्ह्याचे पालकमंत्री अशी मंत्रीपदे घेवून आपली व तालुक्याची राजकीय ताकत दाखविणाऱ्या बबनराव पाचपुते यांनी व्यायामाचा दिनक्रम कायम ठेवून तरुणांपुढे आदर्श ठेवला आहे. 

रात्री कितीही उशिरा घरी आले तरी सकाळी साडेचार वाजता उठून त्यांचा दिनक्रम सुरु होतो. पायी चालणे व धावणे नंतर योगा, प्राणायम त्यासाठी दररोज दोन तास ते देतातच. हे सगळे केल्यावर घराच्या बाहेर पडून लोकांच्या प्रश्नांमध्ये गुंतता. रात्री कधीही झोपले तरी पुन्हा दुसऱ्या दिवशीचा ठरलेला दिनक्रम ठरलेलाच. व्यायामाबद्दल ते कायम जाहीररित्या सांगतात की एक काम बाजूला ठेवा मात्र शरीराकडे लक्ष द्या. शिरुर येथील जीममधील त्यांचा व्यायाम पाहून आता भले भलेही थक्क होत आहेत.

संबंधित लेख