Ex Mayor Vinayak Pande presents cock dance in Ganesh Festival | Sarkarnama

माजी महापौर विनायक पांडेंच्या मंडळाचे कोंबडे मिरवणुकीत गावभर नाचले 

सरकारनामा
सोमवार, 24 सप्टेंबर 2018

 माजी महापौर, शिवसेना नेते विनायक पांडे यांच्या शिवसेना युवक मित्र मंडळाची विसर्जन मिरवणुक यंदा चर्चेचा विषय ठरली.

नाशिक :  माजी महापौर, शिवसेना नेते विनायक पांडे यांच्या शिवसेना युवक मित्र मंडळाची विसर्जन मिरवणुक यंदा चर्चेचा विषय ठरली. मंडळाने यंदा नृत्य करणारे कोंबडे असलेले आदिवासी पथक सहभागी केले होते. त्यांचे हे दोन कोंबडे मिरवणुक मार्गावर सबंध शहरभर नाचले. स्वतः पांडे सह अनेक कार्यकर्तेही कोंबड्यांचे नृत्य पाहुन ठेका धरत होते. ही चर्चा पसरल्यावर अनेकांनी त्याकडे धाव घेतली.

शहरातील भद्रकाली परिसरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेले हे मंडळ मिरवणुक आणि देखाव्यांतील भव्यतेसाठी प्रसिध्द आहे. यंदा त्यांनी ही परंपरा जपण्यासाठी हरसुल भागातील आदिवासी पथक आणले होते. या पथकात प्राण्यांचे नृत्य सादर करण्याची परंपरा आहे. त्यात यंदा त्यांनी कोंबड्याचा वेष केलेले पथक आणले होते.

 त्यांचे हो दोन कोंबडे ढोल, ताषा आणि संगीताच्या तालावर चोच मारत, लयबध्द थीरकणाऱ्या पावलांचे नृत्य करीत होते. मिरवणुकीत सहभागी लोकांसाठी हे नृत्य नवलाईच ठरले. त्यामुळे अनेकांना त्यावर ठेका धरला होता. मंडळाचे पदाधिकारी, माजी महापौर पांडे तसेच अन्य नागरीकही जिथे  नाचणारे हे कोंबडे पोहोचत तिथे ठेका धरीत होते. या कोंबड्याची माहिती मिळाल्यावर अनेकांनी या मंडळाची मिरवणुक पाहण्यासाठी धाव घेतली. 
 

संबंधित लेख