Ex Maharashtrakesari Appasaheb Kadam supports Raju Shetty | Sarkarnama

महाराष्ट्र केसरी आप्पासाहेब कदमांची गदा राजू शेट्टी यांच्या खांद्यावर

संपत मोरे
सोमवार, 17 डिसेंबर 2018

.

पुणे : ​ आप्पासाहेब कदम १९७८ सालचे महाराष्ट्र केसरी होते  .  आप्पासाहेब कदम यांच्या घरी खासदार राजू शेट्टी यांनी भेट दिली, यावेळी कदम यांनी त्याना मिळालेली तीस किलो चांदीची  गदा खासदार शेट्टी यांच्या खांद्यावर ठेवून राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

या भेटीत महाराष्ट्र केसरी कदम म्हणाले,"आजवर मी राजू शेट्टी यांना कधीही राजकीय मदत करू शकलो नव्हतो.  पण आता शरद पवार यांनीच त्यांच्या उमेदवारीला हिरवा कंदील दिल्याने शेट्टी यांच्या विजयाच्या हॅट्ट्रिकसाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत."

आप्पासाहेब कदम  यांचं गाव सांगली जिल्ह्यातील नेर्ले.हे गाव हातकणगले लोकसभा मतदारसंघात आहे.कदम हे १९७८ साली मुंबईत झालेल्या कुस्ती अधिवेशनात महाराष्ट्र केसरी झाले.त्यावेळी त्याना तीस किलो चांदीची गदा मिळाली होती.

कदम हे घरी येणाऱ्या पाहुण्यांचा ही गदा खांद्यावर ठेवुन सत्कार करतात. आजवर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, जयंत पाटील  यांच्या खांद्यावर ठेवून सत्कार केला आहे.

राजू शेट्टी यांच्या खांद्यावर गदा ठेवून सत्कार करून 'तुम्ही लढा आता आम्ही सोबत आहोत.'अस सांगितले.

शेट्टी म्हणाले,"आप्पासाहेब कदम यांच्याबद्दल आदर होताच पण राजकीय मैत्री नव्हती.आता आमची राजकीय मैत्री जमली आहे.त्यांच्या भेटीने बळ वाढलं आहे."
 

संबंधित लेख