माजी IPS अधिकारी व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण विशाखापट्टणम मधून लोकसभेच्या रिंगणात

गडचिरोली, नांदेड, पुणे येथे पोलिस अधीक्षक म्हणून कामाचा ठसा उमटविणारे तसेच सीबीआय सहसंचालक म्हणून आंध्रात कारकिर्द गाजविणारे माजी पोलिस महासंचालक व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण यांनी निवडणुकीच्या राजकारणात प्रवेश केला आहे. ठाणे येथे सहपोलिस आयुक्त, महाराष्ट्राच्या दहशतवादी विरोधी पथकाचे प्रमुख म्हणूनही त्यांनी काम पाहिले. मुंबईची माजी पोलिस आयुक्त सत्यपालसिंह यांनी गेल्या निवडणुकीत भाजपकडून उत्तर प्रदेशमधून लोकसभेचे निवडणूक लढविली होती.
माजी IPS अधिकारी व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण विशाखापट्टणम मधून लोकसभेच्या रिंगणात

पुणे : महाराष्ट्राचे माजी अतिरिक्त पोलिस महासंचालक व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण यांनी अखेर निवडणुकीच्या राजकारणात उडी घेतली असून ते आंध्र प्रदेशचा प्रसिद्ध अभिनेता पवनकल्याण याने स्थापन केलेल्या जनसेना पक्षातर्फे विशाखापट्टणम लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवित आहेत. उमेदवारीही अर्जही त्यांनी दाखल केला आहे. 

लक्ष्मीनारायण यांनी गेल्या वर्षी स्वेच्छा निवृत्ती घेतली होती. ते राजकारणात प्रवेश करणार असल्याचे संकेत देत होते. पण कोणत्या पक्षातून राजकीय कारकिर्द सुरू करणार, हे निश्चित होत नव्हते. ते स्वतःचा पक्ष स्थापन करणार असल्याचीही चर्चा होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या हैद्राबाद येथील अधिवेनशाला त्यांची उपस्थिती होती. त्यामुळे ते भाजपमध्ये जाणार, असे बोलले जाऊ लागले. आंध्रच्या सत्ताधारी तेलगू देसमने त्यांना पक्षात येण्याचे निमंत्रण दिले. मात्र त्याऐवजी त्यांनी पवनकल्याण याने स्थापन केलेल्या नव्या पक्षात नुकताच प्रवेश केला.

पवनकल्याण याचा पक्ष तेलगू देसमसाठी सध्या डोकेदुखी बनला आहे. कापू समाजाचा मोठा पाठिंबा पवनकल्याणला आहे. याचा समाजाचे पाठबळ तेगलू देसमच्या चंद्राबाबू नायडू यांना आहे. त्यामुळे मतपेढीत विभाजन होण्याचा धोका नायडू यांना वाटत होता. त्याचा फायदा वायएसआर काॅंग्रेसच्या जगन मोहन रेड्डी यांना होण्याची शक्यता आहे.

लक्ष्मीनारायण यांनी बेकायदा संपत्ती प्रकरणी जगन मोहन रेड्डी यांची चौकशी केली होती. या प्रकरणी रेड्डी बराच काळ तुरुंगात होते. तसेच जगन यांचे वडील व आंध्रचे माजी मुख्यमंत्री वायएसआर यांच्या हेलिकाॅप्टर दुर्घटनेत झालेल्या अपघाती मृत्यूचीही त्यांनी चौकशी केली होती. कर्नाटकातील बेल्लारी येथील रेड्डी बंधूंच्या खाण गैरव्यवहार प्रकरणही त्यांच्याकडे होते. ते आंध्रमध्ये सीबीआयचे तब्बत सहा वर्षे सहसंचालक (जाॅइंट डायरेक्टर) होते. त्यामुळे त्यांना तेथे `जेडी लक्ष्मीनारायण` असे टोपण नाव पडले आहे.

पवनकल्याण आणि माझी मते जुळत असल्याने त्यांच्या पक्षात जाण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केेले. जगन मोहन रेड्डी यांच्यावरील आरोपांविषयी आता लक्ष्मीनारायण यांनी बोलावे, अशी मागणी मुख्यमंत्री नायडू यांनी केली. `हे प्रकरण न्यायालयात आहे. मी माझ्यापरीने त्याचा तपास केला आहे. त्यामुळे नायडू यांनी मागणी केली तरी मी यावर बोलणार नाही, असे लक्ष्मीनारायण यांचे त्यावर स्पष्टीकरण आहे.

लक्ष्मीनारायण हे नायडू यांच्या `टीम बी`चा भाग असल्याची टीका जगन मोहन रेड्डी करत आहेत. त्यावर लोकांनी काय बोलावे, हे मी कसे सांगणार. त्यांना काय बोलायचे. ते बोलू द्या, असे त्यावर लक्ष्मीनारायण हे प्रत्युत्तर देतात.

त्यांनी झिरो बजेट पाॅलिटिक्स ही संकल्पना मांडली आहे. मी निवडणुकीत कॅश वाटणार नाही. मी लोकांना आनंद आणि प्रेम देईल, याची खात्री असल्याचे त्यांनी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com