evm no change : arora | Sarkarnama

"ईव्हीएम'मध्ये हस्तक्षेप  करणे अशक्‍य : अरोरा 

वृत्तसंस्था
गुरुवार, 20 डिसेंबर 2018

नवी दिल्ली : इलेक्‍ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये (ईव्हीएम) कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप करता येत नाही; पण राजकीय हाणामारीमध्ये याचा फुटबॉल झाल्याचे दिसून येते, असे प्रतिपादन मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी आज केले. 

प्रत्यक्ष निवडणुकीच्या काळामध्ये मतदान यंत्रांमध्ये बिघाड होण्याच्या घटना कमी व्हाव्यात यासाठी आयोगाचे प्रयत्न सुरू असून, यामध्ये बऱ्याच अंशी आम्हाला यश आले असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

विद्यमान अवस्थेबाबत आम्ही फारसे समाधानी नाही आहोत, प्रत्यक्ष निवडणुकीच्या काळामध्ये मतदान यंत्र बिघाडाच्या घटना घडू नयेत म्हणून आमचे प्रयत्न सुरू आहेत, असेही त्यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

प्रत्यक्ष मतदान यंत्रांशी छेडछाड आणि त्यातील बिघाड या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. एखादी चुकीची गोष्ट करण्यासाठी मतदान यंत्राशी छेडछाड केली जाते, तर तांत्रिक बिघाड हे यंत्रामध्ये होतच असतात. 

नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीमध्ये "ईव्हीएम'मधील तांत्रिक बिघाडाच्या फार कमी घटना उघडकीस आल्या होत्या, हे प्रमाण एक टक्‍क्‍यापेक्षाही कमी होते, या मतदानासाठी तब्बल 1 लाख 76 हजार इलेक्‍ट्रॉनिक मतदान यंत्रांचा वापर करण्यात आला होता, असे त्यांनी नमूद केले.  

टॅग्स

संबंधित लेख