Even after her death she helped Families of CRPF martyrs | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

नगरमध्ये डॉ. सुजय विखे जिंकले
रायगडात सुनील तटकरे जिंकले

मरावे परी किर्तीरुपी उरावे : मृत्यूनंतरही 'ती' जवानांच्या कामी आली

एएनआय वृत्तसेवा
शुक्रवार, 22 फेब्रुवारी 2019

.

अजमेर :  राजस्थानमधील अजमेर शहरात एका मंदिरासमोर भीक मागून उदरनिर्वाह करणाऱ्या एका महिलेने आपली आयुष्यभराची पुंजी सहा लाख एकसष्ट हजार रुपये मंदिरांच्या विश्‍वस्थांकडे जमा केली होती. या महिलेचे गेल्या वर्षी निधन झाले होते.

नंदिनी शर्मा असे या महिलेचे नाव होते. सदर महिलेने विश्‍वासाने सोपविलेली रक्कम विश्‍वस्तांच्या हवाली होती. यातील एक विश्‍वस्त संदीप गौर यांनी सांगितले, "आम्ही सदर महिलेची रक्कम बॅंकेत जमा केलेली होती. व्याजासह ही रक्कम सहा लाख एकसष्ट हजार रुपये आहे. ही रक्कम चांगल्या कामासाठी खर्च व्हावी अशी इच्छा या महिलेने बोलून दाखविलेली होती.''

 

 

"ही रक्कम पुलवामा हल्ल्यात मरण पावलेल्या सीआरपीएफच्या जवानांच्या कुटुंबीयांसाठी खर्च व्हावी असे आम्ही सर्वांनी ठरविले. त्यामुळे राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांच्या रिलिफ फंडात जवानांसाठी ही रक्कम आम्ही जमा केली आहे.''

अजमेरचे जिल्हाधिकारी विश्‍वमोहन शर्मा म्हणाले, " विश्‍वस्तांनी सदर महिलेच्या पैशांचा धनादेश माझ्याकडे हस्तांतरित केला आहे. या घटनेतून अनेक लोकांना प्रेरणा मिळेल आणि ते शहीद जवानांसाठी काही तरी करतील अशी मला खात्री आहे."
 

टॅग्स

संबंधित लेख