पहिलं पाऊल : महत्वाकांक्षा होती महापौरपदाची; मात्र आमदार झाले - देवयानी फरांदे 

"पक्षाने मला 1999 मध्ये विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीसाठी विचारणा केली. मात्र, मला महापौर होण्याची मनिषा असल्याने मी नकार दिला. माझ्या राजकीय वाटचालीत महापौरपदाने दोन- तीन वेळा हुलकावणी दिली. मात्र, मतदारांच्या सदिच्छा कायम होत्या. त्यांनी मला आमदार केले.'' भारतीय जनता पक्षाच्या नाशिक मध्य मतदारसंघाच्या आमदार प्रा. देवयानी फरांदे राजकारणातील आपल्या प्रवासाविषयी सांगत होत्या.
पहिलं पाऊल : महत्वाकांक्षा होती महापौरपदाची; मात्र आमदार झाले - देवयानी फरांदे 

नाशिक : "पक्षाने मला 1999 मध्ये विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीसाठी विचारणा केली. मात्र, मला महापौर होण्याची मनिषा असल्याने मी नकार दिला. माझ्या राजकीय वाटचालीत महापौरपदाने दोन- तीन वेळा हुलकावणी दिली. मात्र, मतदारांच्या सदिच्छा कायम होत्या. त्यांनी मला आमदार केले.'' भारतीय जनता पक्षाच्या नाशिक मध्य मतदारसंघाच्या आमदार प्रा. देवयानी फरांदे राजकारणातील आपल्या प्रवासाविषयी सांगत होत्या.

प्रा. फरांदे म्हणाल्या, ''माझे कुटुंब व्यापारी पार्श्‍वभूमी असलेले. प्राथमिक शिक्षण गुजराती भाषकांची संस्था असलेल्या आर. पी. विद्यालयात झाले. शालेय जीवनापासुनच प्रत्येक गोष्टीत पुढाकार घ्यायचे, जे करु ते मनापासुन करायचे. त्यामुळे मी शाळेची 'पंतप्रधान' झाले. 'केटीएचएम' महाविद्यालयात पदवी तर पुणे विद्यापीठात मायक्रोबायोलॉजी विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. त्यानंतर मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या फार्मसी महाविद्यालयात प्राध्यापक झाले. बावीस वर्षे प्राध्यापक म्हणून नोकरी केली. त्यानंतर राजकीय व्यापामुळे सध्या रजा घेतली आहे." 

मी गेली एकोणतीस वर्षे भाजपची कार्यकर्ती आहे विविध पदावंर काम केले हा प्रवास स्पष्ट करतांना त्या म्हणाल्या, ''मी गुजराती भाषिक. मात्र, प्रचंड वाचनातुन मी मराठी आत्मसात केली. राजकारणाशी संपर्क आला तो विवाहानंतर. प्रा. सुहास फरांदे यांच्याशी विवाह झाला. त्यांची पार्श्‍वभूमी भाजपची होती. विवाहानंतर दोन- चार दिवसांनीच 1989 मध्ये लोकसभा निवडणुक जाहीर झाली. त्यात मी भाजपचा प्रचार केला. हे राजकारणातले पहिल पाऊल. पती प्रा. फरांदे यांनी 1992 मध्ये नगरसेवक झाले. तो प्रभाग राखीव झाल्यावर 1997 मध्ये मी उमेदवारी केली व नगरसेविका झाले. त्यानंतर 2002 मध्ये महापालिका निवडणुकीत पराभव झाला. त्यातुन पक्षांतर्गत व बाहेरचे दोन्ही स्तरावरील राजकारणातील बारकावे समजले. मी अधिक उत्साहाने काम करुन 2007 मध्ये निवडणुक जिंकले व 2009 मध्ये शहराची उपमहापौर झाले. 2014 मध्ये पुन्हा महापालिका निवडणुकीत विजयी झाले. या कालावधीत महापालिका सभागृह, शहराच्या विविध प्रश्‍नांवर घेतलेली आक्रमक भूमिका, राजकीय कामकाजातुन 2014 मध्ये पक्षाने संधी दिली व आमदार झाले. मी राजकारणात आले तेव्हा काहीच अपेक्षा नव्हती. काम करु लागले तेव्हा शहराचे महापौर व्हावे अशी महत्वाकांक्षा निर्माण झाली. मात्र मतदारांनी मला आमदार केले असा माझा राजकीय प्रवास आहे." 

त्या पुढे म्हणाल्या, "गेल्या चार वर्षात विधीमंडळात अनेक विषयांवर काम करण्याची संधी मिळाली. विशेषतः ह्युमन ट्रॅफिकींगच्या विषयावर पाठपुरावा केला. मुख्यमंत्र्यांनी स्वतः त्याची दखल घेतली. आता त्याचे कायद्यात रुपांतर होत आहे. गोदावरी पुररेषेचा प्रभाव कमी करण्यासाठी केंद्रीय अहवालाची कार्यवाही, बसस्थानक, महिला रुग्णालय, झोपडपट्टी पुर्नवसन असा विविध योजनांवर काम केल्याने मतदारांना न्याय देता आला. त्याचे समाधान वाटते." 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com