emran khan new priminister of pak siddu attend | Sarkarnama

इम्रान यांच्या शपथविधिला गेलेल्या सिद्धूवर टीकेचा भडिमार 

वृत्तसंस्था
शनिवार, 18 ऑगस्ट 2018

इस्लामाबाद : प्रस्थापित पक्षांना धूळ चारून सर्वाधिक जागा मिळविलेले पाकिस्तान तेहरीक ए इन्साफ पक्षाचे अध्यक्ष आणि माजी क्रिकेटपटून इम्रान खान (वय 65) यांनी आज पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली. या शपथविधिला भारतातून गेलेले माजी क्रिकेटपटू आणि कॉंग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू हे पाकव्याप्त काश्‍मीरचे अध्यक्ष मसूद खान यांच्या शेजारीच बसल्याने सोशल मीडियावर त्यांच्यावर टीकेचा भडिमार होत आहे. 

या दोघांचे छायाचित्र ट्‌विटरवर व्हायरल होताच काही सेकंदातच सिद्धू यांचा निषेध करणाऱ्या प्रतिक्रियांचा पाऊस ट्‌विटरवर पडला. तसेच पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल बाज्वा यांनीही सिद्धू यांना दोन वेळेस मिठी मारली. यावरूनही नेटकरांनी सिद्धू यांना झोडपले. 

भ्रष्टाचाराने बरबटलेल्या पाकिस्तानी राजकारणात 22 वर्षांपूर्वी प्रवेश केलेले इम्रान हे देशाचे 22 वे पंतप्रधान ठरले आहेत. 

इस्लामाबादमधील अध्यक्षीय प्रासादात झालेल्या साध्या समारंभात पाकिस्तानचे अध्यक्ष मामनून हुसेन यांनी इम्रान खान यांना पदाची शपथ दिली. शपथ घेताना भावनावश झालेले इम्रान हे काही उर्दू शब्दांवर अडखळले.

या समारंभाला पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमार बाज्वा, माजी भारतीय क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू, पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू रमीझ राजा, वासिम अक्रम आणि इतर काही विशेष पाहुणे उपस्थित होते.

सिद्धू यांनी काश्‍मिरी शाल इम्रान यांना भेट म्हणून दिली. नवाज शरीफ यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर कार्यभार सांभाळत असलेले नासिरुल मुल्क यांच्या नेतृत्वाखालील हंगामी सरकार बरखास्त करण्यात आले आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख