चिमूर गडचिरोली लोकसभा मतदारसंघ - भाजप आणि काँग्रेसलाही निवडणूक सोपी नाही

या लोकसभा मतदारसंघाची ओळख राज्यात विस्ताराने सर्वांत मोठा मतदारसंघ अशी असून त्यात गडचिरोली, चंद्रपूर आणि गोंदिया या तीन जिल्ह्यांतील सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. सध्या भाजपाच्या खात्यात असलेल्या या लोकसभा मतदारसंघातील आगामी निवडणूक भाजपा व कॉंग्रेस या दोघांसाठीही फारशी सोपी नाही.
Ashok Nete - Dr. Namdev Usandi - Dr. Namdev Kirsan - Dr. Nitin Kodavte
Ashok Nete - Dr. Namdev Usandi - Dr. Namdev Kirsan - Dr. Nitin Kodavte

चिमूर : या लोकसभा मतदारसंघाची ओळख राज्यात विस्ताराने सर्वांत मोठा मतदारसंघ अशी असून त्यात गडचिरोली, चंद्रपूर आणि गोंदिया या तीन जिल्ह्यांतील सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. सध्या भाजपाच्या खात्यात असलेल्या या लोकसभा मतदारसंघातील आगामी निवडणूक भाजपा व कॉंग्रेस या दोघांसाठीही फारशी सोपी नाही. एकीकडे विद्यमान खासदार भाजपाचे अशोक नेते यांच्याबद्दल नाराजी आहे; तर, तर दुसरीकडे कॉंग्रेसमधील अंतर्गत गटबाजीमुळे तिकीट वाटपावरून सुरू असलेले वादंग अजूनही संपण्याची स्थिती नाही.

2014 मध्ये झालेल्या निवडणुकीत गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात भाजपचे अशोक नेते अडीच लाख मतांनी विजयी झाले होते. मोदी लाटेमुळे सहाही विधानसभा क्षेत्रात भाजपला चांगली बढत मिळाली होती. निवडणुकीदरम्यान मतदारांना दिलेले एकही आश्‍वासन खासदार नेते यांनी पूर्ण केले नाही, असा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत भाजपपुढे मोठे आव्हान असणार आहे. मात्र नगर पालिका, नगर पंचायती व जिल्हा परिषदेमध्ये भाजपची सत्ता असणे खासदार नेतेंसाठी जमेची बाजू आहे.

कॉंग्रेस आणि भाजपची निवडणूक तयारी तशी सुरू झाली आहे. भाजपमध्ये उमेदवारी मिळविण्यासाठी विद्यमान खासदार अशोक नेते आघाडीवर आहेत. उमेदवाराच्या कामाबाबत विधानसभानिहाय कानोसा घेतला असता अशोक नेते यांच्याबाबत नाराजी दिसून येत आहे. संघ वर्तुळातही त्यांच्याबाबत नाराजी आहे. परंतु, त्यांना पर्याय म्हणून भाजपकडे दुसरा तगडा उमेदवार नाही. त्यामुळे नेतेंच्या उमेदवारीत बदल होईल, असे सध्यातरी वाटत नाही.

कॉंग्रेसकडून माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, डॉ. एन. डी. किरसान, डॉ. नितीन कोडवते हे तीन डॉक्‍टर तिकिटासाठी इच्छुक आहेत. ते आपापल्या परीने प्रयत्न करीत आहेत. मात्र सध्यातरी कॉंग्रेसच्या उमेदवाराबाबत अनिश्‍चितता दिसून येत आहे. डॉ. नामदेव उसेंडी गेल्या वेळी पराभूत झाले होते. त्यामुळे नव्या चेहऱ्याला संधी देण्याची मागणी एका गटाकडून होत आहे. डॉ. किरसान हेही बैठका, जनसंपर्क यात्रेतून आपली दावेदारी सांगत आहेत. आमदार विजय वडेट्टीवार यांचे निकटवर्ती डॉ. नितीन कोडवते यांनी गेल्या अनेक दिवसांपासून जनसंपर्क सुरू केला आहे.

या लोकसभा क्षेत्रातील राजकीय परिस्थिती बघता चिमूर, ब्रह्मपुरी, आमगाव व अहेरी विधानसभा क्षेत्रात कॉंग्रेसची शक्ती आहे. तेथेच भाजपला बरीच मेहनत घ्यावी लागणार आहे. ओबीसींचे आरक्षण हा या क्षेत्रातील प्रभावी मुद्दा राहणार आहे. सोबतच बेरोजगारी, सिंचन, देसाईगंज, गडचिरोली रेल्वे मार्ग, मेडीगट्टा सिंचन प्रकल्प, सुरजागड प्रकल्प आदी विषयांवर कॉंग्रेसकडून भाजपविरोधात हल्लाबोल होऊ शकतो.

लोकसभा निवडणूक 2014 चे मतविभाजन
अशोक नेते (भाजप) - 5 लाख 35 हजार 982
डॉ.नामदेव उसेंडी (कॉंग्रेस) - 2 लाख 99 हजार 112
रामराव नन्नावरे (बसपा) - 66 हजार 906
रमेशकुमार गजबे (आम आदमी पार्टी) - 45 हजार 458

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com