पराजयाचे श्रेय घेण्याची वृत्ती नेतृत्वात असली पाहिजे : नितीन गडकरी 

पराजयाचे श्रेय घेण्याची वृत्ती नेतृत्वात असली पाहिजे : नितीन गडकरी 

पुणे : "" विजयाचे अनेक बाप असतात, मात्र अपयश हे अनाथ असते. यामुळे अपयशाचे श्रेय घेण्याची वृत्ती नेतृत्वात असली पाहिजे. त्यातूनच नेतृत्वाची संस्थेशी असलेली बांधिलकी दिसते,' असे प्रतिपाद केंद्रीय जहाज बांधणी आणि रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे केले. 

या वक्तव्यामुळे नुकत्याच चार राज्यांच्या निवडणुक निकालांवर आहे का ? अशी कुजबुज राजकीय क्षेत्रात सुरु झाली आहे. 

पुणे जिल्हा नागरी सहकारी बॅंक्‍स असोसिएशनतर्फे आयोजित विविध बॅंकाच्या गौरव समारंभात गडकरी बोलत होते. यावेळी सहकारमंत्री सुभाष देशमुख, खासदार अनिल शिरोळे आदी मान्यवर उपस्थित होते. 

गडकरी म्हणाले,"" निवडणुकीत हरलेल्या उमेदवाराला त्याच्या पराभवाचं कारण विचारताच तो दुसरीकडं बोट दाखवतो. पक्षानं पैसे दिले नाहीत, एन वेळी सभा रद्द केली, निवडणुकीचे सामान मिळाले नाही. अशी विविध कारणे सांगतो. मात्र झालेला पराभव हा त्याचा संपर्क कमी पडलेला असतो. उमेदवाराची विश्‍वासअर्हता कमी झालेली असते अशी विविध कारणे असतात. अशावेळी विजयाचे अनेक बाप असतात, मात्र अपयश हे अनाथ असते. यामुळे अपयशाचे श्रेय घेण्याची वृत्ती नेतृत्वात असली पाहिजे.'' 

सहकारी बॅंकर्सला सल्ला देताना ते म्हणाले, "" सहकारी बॅंकांची विश्‍वासार्हता हि 21 व्या शतकातील भांडवल असून, व्यावसायिक दृष्टीकोन ठेऊन पारदर्शकता वाढविण्याची गरज आहे. सहकारी संस्थेच्या यशस्वी होण्यासाठी विश्‍वासअर्हता, व्यक्तीगत संबंध आणि संपर्क या त्रिसुत्री गरजेच्या आहेत. या त्रिसुत्रीचा योग्य वापर केल्या संस्था यशस्वी होतात.

सहकारी क्षेत्राचा नेता म्हणजे इंजिन असते. एक इंजिन असेल तर गाडी नीट चालते. अनेक इंजिने आली की गोंधळ उडतो. तर अनेक संस्था कायद्या मोडुन काम करत असल्यामुळे अडचणीत येतात. यामुळे सर्वच सहकार क्षेत्र बदनाम होते. याचा फटका चांगले काम करणाऱ्या संस्थांना होतो.असेही ते म्हणाले.  

गडकरी म्हणाले,"" गरजु व्यक्ती, उद्योगांना कर्ज देताना कायदा वाकवा मात्र तोडु नका. सध्या माहितीचा अधिकार आणि तंत्रज्ञानाच्या युगात बॅंका चालवणे अवघड झाले असून, पारदर्शकते शिवाय यशस्वी होणे अवघड आहे. तर 21 व्या शतकात सहकारी संस्थांची विश्‍वासअर्हता हेच भांडवल असणार असून, या क्षेत्रात व्यावसायिकता हवी, पण कॉर्पोरेट कल्चर आणु नका."

सुभाष देशमुख म्हणाले,"" अनेक सहकारी बॅंका चांगले काम करत असून, रिझर्व्ह बॅंकेकडून नागरी सहकारी बॅंकांना सापत्न वागणूक मिळत आहे. अडचणीतील राष्ट्रीयकृत बॅंकांना केंद्र सरकारकडुन पॅकेज दिली जातात. मात्र सहकारी बॅंकांना वाऱ्यावर सोडले जात आहे. विविध बॅंक हमीसाठी सहकारी बॅंकांना परवानगी दिल्यास व्यवसायवृद्धी होईल. नागरी सहकारी बॅंकाच्या प्रश्‍नांसाठी नितीन गडकरी यांनी पुढाकार घेऊन, केंद्रिय अर्थमंत्र्यांबरोबर बैठक घ्यावी.अशी मागणी यावेळी केली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com