election commition | Sarkarnama

तीन महापालिका निवडणुकीसाठी 8 हजारावर कर्मचारी सज्ज

संदीप खांडगेपाटील
शुक्रवार, 5 मे 2017

मुंबई : पनवेल, मालेगाव, भिवंडी-निजामपूर या तीन महानगरपालिकांची 24 मे रोजी सार्वत्रिक निवडणूक होत असून त्यासाठी एकूण 8650 कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. हे निवडणूक कर्मचारी त्या त्या स्थानिक स्वराज्य संस्थेमधील कर्मचारी असून आवश्‍यकता पडल्यास शेजारच्या महापालिकेतील प्रशिक्षित कर्मचारी मदतीला घेण्यात येणार आहे. 

मुंबई : पनवेल, मालेगाव, भिवंडी-निजामपूर या तीन महानगरपालिकांची 24 मे रोजी सार्वत्रिक निवडणूक होत असून त्यासाठी एकूण 8650 कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. हे निवडणूक कर्मचारी त्या त्या स्थानिक स्वराज्य संस्थेमधील कर्मचारी असून आवश्‍यकता पडल्यास शेजारच्या महापालिकेतील प्रशिक्षित कर्मचारी मदतीला घेण्यात येणार आहे. 
या तीन महानगरपालिकांपैकी पनवेल महानगर पालिकेची पहिलीच सार्वत्रिक निवडणूक होत असून 2016 मध्ये 1 ऑक्‍टोबर रोजी नगरपरिषदेतून महानगरपालिकेत या शहराचे रूपांतर झाले आहे. पनवेल महापालिका कार्यक्षेत्रात कागदोपत्री 5 लाख 9 हजार 901 लोकसंख्या असून यातील 4 लाख 25 हजार 453 मतदार आहेत. या महापालिकेत 78 नगरसेवक निवडले जाणार आहेत. पनवेल महानगरपालिकेकरता 570 मतदान केंद्र निश्‍चित करण्यात आले असून 2850 निवडणूक कर्मचारी निवडणुकीकरिता नियुक्त करण्यात आले आहेत. 

भिवंडी-निजामपूर महानगरपालिका कार्यक्षेत्रात कागदोपत्री 7 लाख 9 हजार 665 लोकसंख्या असून यातील 4 लाख 79 हजार 253 मतदार आहेत. या महापालिकेकरीता 90 नगरसेवक निवडले जाणार आहेत. भिवंडी निजामपूर महानगरपालिकेकरीता 644 मतदान केंद्र निश्‍चित करण्यात आले असून 3220 निवडणूक कर्मचारी या मनपा निवडणुकीकरिता नियुक्त करण्यात आले आहेत. 

मालेगाव महानगरपालिका कार्यक्षेत्रात शासकीय कागदोपत्री 5 लाख 90 हजार 998 लोकसंख्या असून यातील 3 लाख 91 हजार 320 मतदार आहेत. या महापालिकेकरता 84 नगरसेवक निवडले जाणार आहेत. मालेगाव महानगरपालिकेकरता 516 मतदान केंद्र निश्‍चित करण्यात आले असून 2580 निवडणूक कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. या तीन महापालिकांकरता 24 मे रोजी मतदान होत असून 26 मे रोजी मतमोजणी होणार आहे.

राज्य निवडणूक आयोगाकडून मतदानाच्या दोन दिवस अगोदर छाननी करण्यात येणार असून वेळ पडल्यास मतदान केंद्राची संख्या वाढविली जाण्याची शक्‍यता आहे. या महापालिका निवडणुकीकरिता महापालिकेतीलच कर्मचारी वापरण्यात येणार असून वेळ पडल्यास शेजारच्या महापालिकेतील प्रशिक्षित कर्मचारी वर्गही मागविला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 
 

संबंधित लेख