ELECTION ALL PARTY IN WORRY | Sarkarnama

लोकसभेबरोबर विधानसभा तर होणार नाही ना ? 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 18 ऑगस्ट 2018

मुंबई ः लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या चर्चेमुळे राज्यातील सर्वपक्षीय नेते आणि कार्येकर्ते गोंधळात पडले आहेत. या दोन्ही निवडणुकांची नेमकी तारीख कोणती याचा अंदाज या चर्चेमुळे बांधता येत नसल्याने या गोंधळात आणखीनच भर पडली आहे. 

मुंबई ः लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या चर्चेमुळे राज्यातील सर्वपक्षीय नेते आणि कार्येकर्ते गोंधळात पडले आहेत. या दोन्ही निवडणुकांची नेमकी तारीख कोणती याचा अंदाज या चर्चेमुळे बांधता येत नसल्याने या गोंधळात आणखीनच भर पडली आहे. 

केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे "एक राष्ट्र, एक निवडणुक पद्धतीवर ठाम आहेत. मात्र एकाचवेळी देशात लोकसभा आणि विधानसभा निवडणूक घेणे हे नजिकच्या काळात शक्‍य नाही, असे केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. त्यामुळे थोडा संम्रभ दूर झाला असला तरी लोकसभेबरोबर काही राज्याच्या निवडणुका घेतल्या जाऊ शकतात ही शक्‍यता बळावली आहे. 

लोकसभेची आचारसंहिता फेब्रुवारी 2019 मध्ये लागू होऊ शकते. लोकसभेनंतर सहा महिन्यांनी राज्य विधानसभेची मुदत संपते. म्हणजेच राज्य विधानसभेची निवडणुक लागू शकते. मात्र लोकसभेबरोबर राज्यातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचा राजीनामा घेऊन मुदतपूर्व निवडणुका लागल्या तर लोकसभेबरोबर तयारी करावी लागेल, असे सर्वपक्षीय आमदार, खासदार, पक्षांचे पदाधिकारी यांना वाटत आहे. 

त्याचबरोबर लोकसभेची निवडणुक डिसेंबर 2018 मध्ये होणाऱ्या मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड या तीन राज्याबरोबर घ्यायचे ठरवले तर तयारीसाठी आणखी कालावधी कमी मिळणार आहे. यामुळे तयारीला वेळ फार थोडा राहतो, या भीतीने उचल खाल्ली असल्याचे राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते खासगीत सांगतात.त्यामुळे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तारखा केव्हा जाहीर होणार याबाबत सर्वच पक्षातील नेते कार्यकर्ते यांच्या संम्रभ असून यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाल्याचे राजकिय पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून सांगितले जाते. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख