elect ulahas Pawar as marathi literary president | Sarkarnama

उल्हास पवार यांना साहित्य संमेलनाचे अध्यक्ष करावे : गडाख 

पांडुरंग सरोदे
सोमवार, 18 सप्टेंबर 2017

पुणे : कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हासदादा पवार यांना एकदा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष करायला हवे, अशी भावना कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी पुण्यात व्यक्त केली. 

महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे गडाख यांचा अमृतमहोत्सवानिमित्त खास सत्कार करण्यात आला. यावेळी माजी आमदार उल्हास पवार, संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे, "मसाप"चे कार्याध्यक्ष प्रा.मिलिंद जोशी, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार, प्रकाश पायगुडे, गडाख यांच्या पत्नी शारदा गडाख उपस्थित होत्या. 

"उल्हास पवार हे पुण्यातील चालताबोलता सांस्कृतिक इतिहास आहेत. मंत्र्यांना ओळखत नाहीत, इतके त्यांना जनता ओळखते. यशवंतरावांनी जी माणसे उभी केली. त्यात त्यांचा क्रमांक वरचा आहे,'' असे गडाख यांनी सांगितले. उल्हास पवार यांनी गडाख यांच्या सूचनेवर भाषणात कोणती प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. मात्र यशवंतरावांचा सांस्कतिक वारसा चालवत असल्याचा अभिमान असल्याचे नमूद केले. 

गडाख म्हणाले, ""शिक्षणाने नाही तर अनुभवाने शहाणपण येते. अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून संघर्ष करत आमची पिढी पुढे आली. संकटे अंगावर घेण्याचा विचार यशवंतराव चव्हाण यांनी दिला. गरीबी, दारिद्रय, शेतीचे प्रश्न तेव्हाही होते. हे प्रश्न सोडवितानाच शिक्षणाला प्राधान्य दिले. शैक्षणिक संस्थांबरोबरच उद्योग-व्यवसायही काढले.रोजगाराच्या संधी दिल्या. राजकारणात सभापती, जिल्हा परिषद अध्यक्ष, आमदार, खासदार झालो. पण राजकारणाला कायम दुय्यम स्थान दिले आणि 
समाजनिर्मिती करत राहिलो.'' 

""जीवनात अनेक कटू-गोड आणि चांगले- वाईट अनुभव आले. खासदारकी गेली. भाषणात परखडपणे बोलल्यामुळे सहा महिने मतदारयादीतून नावही गायब केले. माझ्यासाठी राजकारणाचा एक दरवाजा बंद झाला. मात्र साहित्य क्षेत्राचा दुसरा दरवाजा खुला झाला. बोलत राहीलो. लिहित राहिलो. साहित्यिकांमध्ये रमलो. अनेकांनी मला फसविले. मात्र आज 75 व्या वर्षी मी समाधानी आहे. माझ्या मनात कोणाबद्दलही राग, द्वेष नाही,'' अशा शब्दात गडाख यांनी आपल्या मनाचा मोठेपणा दाखविला.  

संबंधित लेख