घराणेशाहीचे 'लाड' बंद करा, सुवर्णा जोशी यांना विजयी करा : खासदार श्रीरंग बारणे

सामाजिक क्षेत्राला आयुष्य अर्पण केलेल्या जोशी कुटुंबातील सुवर्णा जोशी यांच्या रूपाने या सर्व समस्या सोडविणारे नेतृत्व समोर येत आहे. -खासदार श्रीरंग बारणे
joshi-barne
joshi-barne

कर्जत   : " समस्यांचे शहर बनलेल्या कर्जतला सुंदर बनविण्यासाठी शिवसेना-भाजप-आरपीआय यांच्या महायुतीला विजयी करा . पण कर्जतमधून विजयाची सुरुवात करा ,"असे आवाहन खासदार श्रीरंग बारणे यांनी जाहीर सभेत केले.

कर्जत नगरपालिकेच्या निमित्ताने शिवसेना-भाजप-आरपीआय महायुतीची जाहीर सभेने कर्जतच्या टिळक चौकात झाली,त्या जाहीर सभेला संबोधित करीत असताना खासदार श्रीरंग बारणे बोलत होते . 

श्री. बारणे पुढे म्हणाले," सत्ताधाऱ्यांनी शहरातील समस्या सोडविल्या नाहीत, त्यामुळे कर्जत हे समस्यांचे शहर बनले आहे.मुंबईचे उपनगर म्हणून कर्जतची वाढ होत आहे,पण नागरीकरणाला आवश्यक असलेल्या सुविधा उपलब्ध करून दिल्या नाहीत .  सामाजिक क्षेत्राला आयुष्य अर्पण केलेल्या जोशी कुटुंबातील सुवर्णा जोशी यांच्या रूपाने या सर्व समस्या सोडविणारे नेतृत्व समोर येत आहे. घराणेशाहीचे 'लाड' बंद करा, सुवर्णा जोशी यांना विजयी करा".

पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांनी सभेला संबोधित करताना महायुती कर्जतमधून राज्य आणि देशाला देतील असा विश्वास यावेळी व्यक्त केला.

तर उरणचे आमदार मनोहर भोईर यांनी कर्जत हद्द सोडली की रस्ते बघा असे सांगून घराणेशाहीला उद्धवस्त करा आणि युतीचे सरकार आणून 'लाड' करायचे थांबवा असे आवाहन केले. 

यावेळी बोलताना आमदार देवेंद्र साटम म्हणाले ," कर्जतची नळपाणी योजना आपले  उपोषण झाल्यानंतर 1995 मध्ये 100 टक्के अनुदानाने शासनाने मंजूर केली,आणि त्याचे श्रेय विद्यमान आमदार घेत आहेत. एमएमआरडीए रस्ते बनविण्यासाठी निधी राज्य सरकार बांधत आहे,मात्र श्रेय हे घेणार? आम्ही श्रेय घेण्यासाठी नाही तर नगरपालिका जिंकून युतीची गाठ आणखी घट्ट बांधा ."
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com