ekntah khadse about maratha and dhangar reservation | Sarkarnama

खडसेंचा मराठ्यांच्या ओबीसी आरक्षणाला विरोध, धनगरांच्या आदिवासी आरक्षणाला पाठिंबा! 

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 13 ऑगस्ट 2018

राज्य सरकारने मराठा दिलेले आरक्षण हे स्वतंत्र कोट्यातले आहे, मात्र हे आरक्षण न्यायालयीन लढाईत टिकणार नाही, अशी चिंता अनेक मराठा विचारवंत, नेत्यांना आहे. त्यामुळे टिकाऊ आरक्षणासाठी ओबीसी कोट्यातून आरक्षण दिले जावे, अशी मागणी आहे. या मागणीला ओबीसी नेत्यांचा विरोध आहे, मात्र ते व्यक्‍त होत नाहीत. मूळ आरक्षणाला धक्‍का लागू नये, एवढेच ते म्हणत आहेत. मात्र एकनाथ खडसे यांनी मराठ्यांच्या ओबीसी प्रवेशाला थेट विरोध केला आहे. 

पुणे: मराठा आरक्षणाच्या मुद्यावर मराठेतर नेते गोलगोल बोलत असताना भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण द्यायला विरोध केला आहे. दुसऱ्या बाजूला धनगर समाजाला आदिवासी कोट्यातून आरक्षण देण्याच्या मागणीला पाठिंबा दिला आहे. 

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी कुणबी म्हणून ओबीसी कोट्यातून आरक्षण देता येईल, असे म्हटले होते. त्यावर राजकीय क्षेत्रातून प्रतिक्रिया व्यक्‍त झाली नव्हती. काल ओबीसींच्या कार्यक्रमासाठी खडसे नगरमध्ये आले होते. त्यावेळी मराठ्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण कसे देता येईल?, असा सवाल त्यांनी केला. 

धनगर आरक्षणाला आदिवासी समाजाचा तीव्र विरोध असताना खडसे यांनी धनगरांची बाजू यावेळी लावून धरली. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख