हॅकर खोटारटे असतात मग माझ्या बाबतीत हॅकरवर का विश्वास ठेवला : एकनाथ खडसेंचा भाजपला सवाल

भाजपाचे नेते गोपीनाथ मुंडे यांची हत्या ईव्हीएम मशीनच्या माहितीमुळे झाले असल्याचे एका हँकरने म्हटले आहे. हॅकर हे खोटारडे असतात त्यांच्यावर विश्वास ठेवू नये, असे पक्षाने सांगितले. मग माझ्या बाबतीतही हँकर मनीष भंगाळे याने माझ्यावर दाऊद सोबत संभाषण असल्याचे सांगितले होते. मग त्याच्यावर का विश्वास ठेवण्यात आला, असा सवाल भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी येथे केला.
हॅकर खोटारटे असतात मग माझ्या बाबतीत हॅकरवर का विश्वास ठेवला : एकनाथ खडसेंचा भाजपला सवाल

जळगाव : भाजपाचे नेते गोपीनाथ मुंडे यांची हत्या ईव्हीएम मशीनच्या माहितीमुळे झाले असल्याचे एका हँकरने म्हटले आहे. हॅकर हे खोटारडे असतात त्यांच्यावर विश्वास ठेवू नये, असे पक्षाने सांगितले. मग माझ्या बाबतीतही हँकर मनीष भंगाळे याने माझ्यावर दाऊद सोबत संभाषण असल्याचे सांगितले होते. मग त्याच्यावर का विश्वास ठेवण्यात आला, असा सवाल भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी येथे केला.

एकनाथ खडसे व अंडरवर्ड डाॅन दावूद इब्राहिम यांच्यात दूरध्वनी द्वारे संभाषण झाल्याचा व त्याचे काॅल डिटेल्स आपल्याकडे असल्याचा दावा हॅकर मनिष भंगाळे याने केला होता. त्यानंतर मुंबई पोलिसांनी तपासाअंती खडसे यांना क्लीन चीट दिली होती.  फैजपूर येथे  पत्रकार संघाच्या उद्घाटन प्रसंगी याबाबत बोलताना खडसे म्हणाले की, त्याने माझ्यावर जे आरोप केले हे कसे खरे मानण्यात आले? त्यानंतर झालेल्या मीडिया ट्रायल मुळे मला माझ्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. असे  माजी महसूल मंत्री  खडसे यांनी केले. मीडिया ट्रायल मुळे एखाद्याचे आयुष्य उध्वस्त होऊ शकते, अशी खंतदेखील खडसे यांनी व्यक्त केली.

ईव्हीएम हॅकिंगची कल्पना होती म्हणून तत्कालीन केंद्रीय मंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांची हत्या करण्यात आली असा खळबळजनक दावा  लंडनस्थित संगणक हॅकर सय्यद शुजा यानं नुकताच केला होता. त्यामुळं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. मात्र, हा दाव्यात तथ्य नसून एका हॅकरवर कसा विश्वास ठेवायचा, असे सूर भाजपच्या वर्तुळात उठले होते. त्या पार्श्वभूमीवर खडसे यांनी आपल्या मनातली खदखद व्यक्त केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com