Eknath Khadse Praises Raju Shetty | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

विनोद तावडे कृष्णकुंजवर . राज ठाकरे आणि विनोद तावडे यांच्यात चर्चा .

राजू शेट्टींच्या आंदोलनांचे खडसेकडून अभिनंदन 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 25 ऑगस्ट 2018

दूध उत्पादकांची अवस्था वाईट आहे. ते अत्यंत कठीण परिस्थिीतून जात आहेत. दुधाला भाव नसल्यामुळे मोठी समस्या आहे. अशा स्थितीत खासदार शेट्टी यांनी आंदोलन केल्यामुळे शेतकऱ्यांच्या दुधाला पाच रूपये भाव मिळाला त्यामुळे त्यांचे अभिनंदन केलेच पाहिजे - एकनाथ खडसे

जळगाव : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी दूध दरवाढीसाठी केलेल्या आंदोलनामुळेच शेतकऱ्यांच्या दूध भावात पाच रूपये वाढ झाली आहे. त्यामुळे माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी खासदार शेट्टी यांचे अभिनंदन केले आहे. तर जिल्हा दूध संघाच्या बैठकीतही हा अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात आला.

जळगाव जिल्हा दूध संघाच्या सभासदांची वार्षिक सर्वसाधारण सभा 'हॉटेल क्रेझी होम' येथे आयोजित करण्यात आली होती. अध्यक्षस्थानी संघाच्या अध्यक्षा मंदाकिनी खडसे होत्या. यावेळी माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी संस्थेचे संचालक व सभासदही उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या दूधाला भाव नसल्यामुळे परिस्थिती बिकट झाली आहे. अशा स्थितीत खासदार राजू शेट्टी यांनी दूध खरेदीच्या भाववाढीसाठी आंदोलन केले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या दूधाला पाच रूपये भाववाढ मिळाली त्यामुळे त्यांचे अभिनंदन करावे असा ठराव सभासदांनी मांडला त्या एकमताने मंजूरी देण्यात आली. 

एकनाथ खडसे यावेळी बोलताना म्हणाले, ''दूध उत्पादकांची अवस्था वाईट आहे. ते अत्यंत कठीण परिस्थिीतून जात आहेत. दुधाला भाव नसल्यामुळे मोठी समस्या आहे. अशा स्थितीत खासदार शेट्टी यांनी आंदोलन केल्यामुळे शेतकऱ्यांच्या दुधाला पाच रूपये भाव मिळाला त्यामुळे त्यांचे अभिनंदन केलेच पाहिजे.''
 

संबंधित लेख