'ओबीसी' हितासाठी खडसेंचे योगदान मोठे : छगन भुजबळ 

"इतर मागासवर्गीयांसाठी एकनाथ खडसे यांनी वेळोवेळी विधीमंडळात प्रश्‍न उपस्थित केले, चर्चा घडवली. त्याद्वारे त्यांनी 'ओबीसी' हितासाठी चांगले योगदान दिले आहे. भविष्यातही त्यांच्या भूमिकेचा विचार करु. हा राजकारणाच्या पलिकडचा विषय आहे. त्यामुळे भविष्यात 'ओबीसी' व त्यांच्या प्रश्‍नांसाठी खडसेंसह सर्वांना बरोबर घेऊन काम करता येईल," असे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आज सांगितले.
'ओबीसी' हितासाठी खडसेंचे योगदान मोठे : छगन भुजबळ 

नाशिक : "इतर मागासवर्गीयांसाठी एकनाथ खडसे यांनी वेळोवेळी विधीमंडळात प्रश्‍न उपस्थित केले, चर्चा घडवली. त्याद्वारे त्यांनी 'ओबीसी' हितासाठी चांगले योगदान दिले आहे. भविष्यातही त्यांच्या भूमिकेचा विचार करु. हा राजकारणाच्या पलिकडचा विषय आहे. त्यामुळे भविष्यात 'ओबीसी' व त्यांच्या प्रश्‍नांसाठी खडसेंसह सर्वांना बरोबर घेऊन काम करता येईल," असे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आज सांगितले. 

शहरातील मुद्रीत माध्यमांच्या संपादकांशी आज भुजबळ यांनी चर्चा केली. एकनाथ खडसे यांनी ओबीसी प्रश्नांविषयी छगन भुजबळ यांचे समर्थन केले होते. याविषयी ते म्हणाले, "ओबीसी जनगणनेचा प्रश्‍न आम्ही मांडला तेव्हा गोपीनाथ मुंडे सत्तेत होते. संबंधीत खात्याचे मंत्री होते. त्यांनी पक्षाच्या विचारसरणीचा विचार बाजुला ठेऊन आम्हाला प्रतिसाद दिला. त्याबाबत निर्णय घेतला. त्यानंतर सात- आठ दिवसांनी भाजपच्या सुषमा स्वराज यांनी याबाबत मत व्यक्त केले होते. यावेळी एकनाथ खडसे यांनीही मदत केली होती. त्यांनी विधीमंडळात वेळोवेळी प्रश्‍न उपस्थित केले. त्यातुन चर्चा घडवुन आणली. त्याचा ओबीसींच्या हितासाठी उपयोग झाला. त्यामुळे सध्याच्या त्यांच्या भूमिकेचे स्वागत आहे. भविष्यातही विधीमंडळासह विविध स्तरावर त्यांच्याशी चर्चा व अन्य मार्गाने बरोबर घेऊन काम करु. राजकारणाच्या पलिकडचा हा विषय आहे. त्यामुळे सगळ्यांनाच बरोबर घेऊ." 

आगामी राजकीय स्थिती व दिशा काय? या प्रश्‍नावर ते म्हणाले, "अद्याप कोणतीही निवडणूक लढण्याचा विचार केलेला नाही. लोकसभा निवडणुकीचा विचार केला तर नाशिककरांनी माझी हौस फेडलेली आहे. त्यावर न बोललेलेच बरे. भविष्यात काय करायचे हे मी आत्ता सांगु शकत नाही. कारण मी आजारी आहे." पक्ष संघटनेविषयी काय काम करायचे याचा निर्णय पक्ष घेईल. असेही स्पष्टीकरण त्यांनी दिले. यावेळी माजी खासदार समीर भुजबळ उपस्थित होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com