युती तोडण्याची घोषणा करणाऱ्या एकनाथ खडसेंची आठवणही दोन्ही पक्ष जोडताना नाही....

युती तोडण्याची घोषणा करणाऱ्या एकनाथ खडसेंची आठवणही दोन्ही पक्ष जोडताना नाही....

पुणे : शिवसेना आणि भाजपची तब्बल 25 वर्षांची युती तोडण्याची घोषणा भाजपचे नेते एकनाथ खडसे यांनी साडे चार वर्षांपूर्वी केली होती. आता त्यानंतर दोन्ही पक्षांत बरेच पाणी वाहून गेले. पुन्हा दोन्ही पक्ष एकत्र येत असताना मात्र खडसे खड्यासारखे बाजूला पडले आहेत.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करण्यासाठी भाजपचे अध्यक्ष अमित शहा आज मुंबईत दाखल झाले. या वेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, पीयूष गोयल, राज्यातील चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, पंकडा मुंडे हे मंत्री होते. या साऱ्या नेत्यांत खडसे यांचे स्मरणही कोणाला झाले नाही.

खडसे यांनी सप्टेंबर 2014 मध्ये युती तोडण्याची घोषणा केली होती. विधानसभेच्या पाच जागांवरून दोन्ही पक्षांतील युती तुटल्याचे तेव्हा सांगण्यात आले. शिवसेनेशी युती तोडण्याची घोषणा तशी महत्त्वाची होती. त्यावेळी खडसे हे विधानसभेतील विरोधी पक्षनेते होते. फडणवीस हे प्रदेशाध्यक्ष होते. युती तोडण्याचा कटू निर्णय खडसे यांनी जाहीर केला. आज जे भाजप नेते अमित शहा यांच्यासोबत होते, त्यातील अनेक जण साडेचार वर्षांपूर्वी खडसे यांना फारच ज्युनिअर होते. 

युती तोडल्यानंतर शिवसेनेने खडसे यांच्यावर जोरदार टीका केली होती. शिवसेना आणि खडसे दोघांतील वाद काही काळ चांगलाच रंगला होता. सत्ता स्थापन झाल्यानंतर खडसे काही काळ अग्रभागी होते. मात्र भ्रष्टाचाराच्या आरोपावरून खडसे बाजूला पडले. पक्ष आज पुन्हा मोठा निर्णय घेत असताना खडसे हे जळगावपुरतेच मर्यादित राहिल्याचे दिसून येत आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com