ekantha khadase news | Sarkarnama

जनतेशी बांधिलकी, विधीमंडळात प्रश्‍न मांडणार : खडसे 

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 26 फेब्रुवारी 2018

जळगाव : जनतेशी आपली बांधिकली असून त्यांचे प्रश्‍न आपण विधिमंडळात मांडणार आहोत असे मत राज्याचे माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केले. 

राज्याचे विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्या (ता.27)पासून सुरू होत आहे. याबाबत बोलतांना खडसे म्हणाले, जिल्ह्यात शालेय विद्यार्थिनीवर अत्याचाराच्या तीन घटना घडल्या आहेत. या घटना अत्यंत गंभीर आहेत. पास्को कायद्याचीही आता भिती राहिल्याचे दिसत नाही. त्यामुळे यांना फाशीची शिक्षा देण्याचाच कायदा केला पाहिजे. या घटनेतील जे संशयित असतील त्यांना सेवेतून निलंबीत न करता त्यांना थेट बडतर्फच केले पाहिजे. 

याबाबत आपण विधीमंडळात प्रश्‍न उपस्थित करणार आहोत. जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विकासाचे प्रकल्प रखडलेले आहेत. गेल्या चार वर्षात एकही प्रकल्पाचे काम सुरू झालेले नाही. त्याबाबत शासन काय करणार आहे? याबाबतही विचारणा करण्यात येईल, "मग्नेटीक महाराष्ट्र'योजनेत जळगाव जिल्ह्याला काहीही दिले नाही. त्याची तरतूद करण्यात यावे अशी आपली मागणी असणार आहे. 

संबंधित लेख