ekantah khadase bjp mancha | Sarkarnama

नाथाभाऊंनाही भाजपच्या मंचावर स्थान 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 20 डिसेंबर 2018

मुंबई : मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये झालेल्या पराभवानंतर भाजपची मंडळी अधिक सावध झालेली दिसते. मित्र पक्षांना न दुखावण्याच्या धोरणात अचानक बदल करण्याबरोबरच पक्षातील असंतुष्ठ नेत्यांनाही मानाचे पान देण्यात येत आहे. राज्यातील भाजपचे एक वजनदार नेते एकनाथ खडसे यांनाही कालच्या मुंबईतील बैठकीत आग्रहाने मंचावर स्थान दिले. 

खासदार, आमदार, जिल्हाध्यक्षांच्या या एकत्रित बैठकीसाठी उभारलेल्या मंचावर मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांसह महसूलमंत्री चंद्रकांत पाटील आणि ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे विराजमान झाल्या होत्या. यावेळी पक्षाने माजी महसूलमंत्री आणि नाराज नेते खडसे यांना मंचावर नेण्यात आले. 

भाजपच्या तीन हिंदी भाषक राज्यांत कॉंग्रेस जिंकून आली आहे. या ठिकाणी भाजपच्या झालेल्या पराभवामुळे खचून न जाता येणारी निवडणूक जिंकण्याचा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कालच्या बैठकीत आमदार व जिल्हाध्यक्षांना दिला. 

आगामी निवडणुकीमध्ये शिवसेना सोबत आली तर आनंदच आहे; मात्र न आल्यास स्वबळावर लढून जिंकण्याचा आत्मविश्‍वासही आमदारांमध्ये चेतवण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांनी केला. 

हिंदी भाषक पट्ट्यातील पराभव, तसेच शिवसेनेने सातत्याने सुरू ठेवलेली टीका, या पार्श्‍वभूमीवर भाजप आमदारांची बैठक बोलावण्यात आली होती. ही पूर्वनियोजित बैठक राज्यातील आमदारांना दिलासा देण्यासाठी, तसेच आगामी नियोजनासाठी होती, असे सांगण्यात आले. 

संबंधित लेख