ekanath khadse, raosaheb danve, mumbai | Sarkarnama

योग्य वेळी खडसेंना न्याय देऊ : दानवे 

सरकारनामा ब्युरो 
गुरुवार, 17 ऑगस्ट 2017

मुंबई : भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे मंत्रिमंडळाच्या बाहेर आहेत. मात्र, त्यांची चौकशी सुरू आहे. ती पूर्ण झाल्यानंतर त्यांच्याबाबत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आज येथे दिली. 

मुंबई : भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे मंत्रिमंडळाच्या बाहेर आहेत. मात्र, त्यांची चौकशी सुरू आहे. ती पूर्ण झाल्यानंतर त्यांच्याबाबत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आज येथे दिली. 

बोरिवली येथे भाजप कार्यकारणीच्या बैठकीत दानवे यांचे अध्यक्षीय भाषण झाले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पावसाळी अधिवेशनात प्रकाश मेहता यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले परंतू त्यांचा राजीनामा घेतला नाही. मात्र, एकनाथ खडसे यांच्याबाबत अन्याय नाही का वाटत ? असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले, की कार्यकारिणीच्या बैठकीत भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या मंत्र्यांबाबत चर्चा झालेली नाही. पक्ष संघटनेत हा विषय होत नाही. तरही खडसे यांच्या बाबत चौकशी करून न्याय दिला जाईल. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाध्यक्ष अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ज्याप्रमाणे मेहनत घेतात त्याप्रमाणे कार्यकर्त्यांनीही जनतेममध्ये विश्वासनिर्माण करण्यासाठी कार्य केले पाहिजे असे स्पष्ट करून दानवे म्हणाले, की आज कार्यकारिणीची बैठक आहे. यानंतर म्हणजेच आठ दिवसांनी जिल्हा आणि त्यापुढे आठ दिवसांनी तालुका कार्यकारिणीच्या बैठका घेण्यात येणार आहेत. या बैठकीत गेल्या तीन महिन्यात पक्ष संघटनेत झालेल्या कामाचा आढावा घेतला जाणार आहे. 

राजकीय प्रस्तावात राज्य सरकारने केलेल्या कामावर चर्चा होते, कृषी विषयक प्रस्तावात कर्जमाफी, दुष्काळाचे सावट यावर चर्चा होईल. तसेच कार्यकर्त्यांनी कसे काम करावे याबाबत चर्चा केली जाईल. आजच्या बैठकीत फक्त संघटनात्मक चर्चा होईल. मंत्रिमंडळ फेरबदल किंवा माध्यमांना अपेक्षित असलेली चर्चा आजच्या बैठकीत होणार नाही असे दानवे म्हणाले. 

तत्पूर्वी अध्यक्षीय भाषणात दानवे यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली तर सरकार त्याला तोंड देईल आणि आवश्‍यक उपाययोजना राबवेल. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. कर्जमाफीची योजनेची लवकरच अंमलबजावणी होईल असे दानवे म्हणाले. 

दरम्यान, मीरा भाईंदर महानगरपालिका निवडणूक जिंकूच पण नांदेड महानगरपालिका आणि ग्रामपंचायत यासह आगामी सर्व निवडणुकाही जिंकू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

संबंधित लेख