Efforts to unite all former congressman | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मराठा समाजाला स्वतंत्र कोट्यातूनच आरक्षण : मुख्यमंत्री
ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण देणार - मुख्यमंत्री
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी स्वतंत्र प्रवर्ग तयार करणार - मुख्यमंत्र्यांची घोषणा

पूर्वाश्रमीच्या सर्व काँग्रेसजनांना एकत्र आणण्याचे प्रयत्न  

 महेश पांचाळ : सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 20 एप्रिल 2017

मुंबई ता 20 : देशातील भाजपाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी पूर्वाश्रमीच्या कॉंग्रेसजनांना एकत्र आणण्याचे प्रयत्न काँग्रेस पक्षश्रेष्ठी कडून सुरू असल्याचे समजते.

केन्द्रात भाजप सत्तेवर आल्यानंतर काँग्रेसमुक्त भारत करू असे जाहीर वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते.  प्रमुख विरोधी पक्षाला नेस्तनाबूत करण्याचे डावपेच आखण्यात सध्या तरी भाजपला यश आले आहे. देशातील विरोधी पक्ष गलितगात्र झाल्यासारखया स्थितीत असल्याने काँगेसच्या नेत्यांना  भाजपमध्ये प्रवेश देवून  काँग्रेस खिळखिळी करण्याचे प्रयत्न भाजपकडून सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार  पक्षाधयक्ष  सोनिया गांधी यांच्या उपस्थितीत झालेल्या काँग्रेस कमिटीच्या  बैठकीत भाजपाला आव्हान उभे करण्यासाठी पूर्वश्रमीच्या काँग्रेस नेत्यांना एकत्र आणण्याबाबत प्रयत्न करावेत असा विचार मांडण्यात आला.  त्याला सोनिया गांधी यांनी अनुकूलता दर्शवली आहे. फायरब्रँड नेत्या तृणमूल काँग्रेसच्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्यासह काही कारणास्तव काँग्रेसमध्ये असताना दुखावलेल्या  नेत्यांची  समजूत घालून त्यांना एका व्यासपीठावर आणण्याचा प्रयत्न करण्याबाबत पावले उचलावीत ,यावर सकारात्मक चर्चा झाली असल्याचे समजते.

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी भाजपकडून कोणाला  उमेदवारी  देणार यावरून सत्ताधारी भाजपमध्ये चर्चा सुरू असली तरी, विरोधी पक्षाचा तगडा  उमेदवार देण्याबाबत काँग्रेसकडून  प्रयत्न  केले जात आहे. राहुल गांधी यांच्या हाताखाली ज्येष्ठ मंडळी काम करण्याची शक्यता कमी आहे त्यामुळे चांगली नेते मंडळी काँग्रेस मध्ये आल्यास त्यांना मानाचे स्थान देण्याबाबत पक्षाध्यक्ष अनुकूल असल्याचे  सांगण्यात  येते.

संबंधित लेख