शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांची बदली 

शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांची बदली 

पुणे : अखेर गेल्या काही वर्षांपासून विविध निर्णयांमुळे वादग्रस्त ठरलेले शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांची सोमवारी (ता.11) बदली झाली. त्यांच्यावर आता सामान्य प्रशासन विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. डॉ. वंदना कृष्णा या नव्या शिक्षण सचिव असणार आहेत. 

कृष्णा या सध्या अर्थ विभागात कार्यरत होत्या. नंदकुमार यांनी शालेय विभागाचे प्रधान सचिव असताना काही नवीन निर्णय घेण्याचा प्रयत्न केला. त्यात प्रामुख्याने राज्यातील मराठी शाळा बंद करणे, पुस्तक, शाळांमधील राष्ट्रीय नेत्यांच्या प्रतिमा आणि शाळांसाठी अग्निशामक यंत्र खरेदी आदींचा समावेश होता. विशेष म्हणजे हे सर्वच्या सर्व निर्णय वादग्रस्त ठरले होते. याउलट गुणवत्तावाढीसाठी त्यांनी चांगले प्रयत्न केले होते. त्यामुळे अनेक निर्णय वादग्रस्त होऊनही केवळ गुणवत्तावाढ या एकाच मुद्यामुळे गेली सुमारे तीन वर्षे त्यांना सातत्याने अभय मिळाले होते. या वादग्रस्त निर्णयांशिवाय राज्याच्या शालेय शिक्षण विभागाकडे असलेल्या द्विभाषिक पुस्तक खरेदीत गडबड झाली होती. याबाबतचे सुमारे 40 कोटी रुपयांचे काम त्यांनी नवी दिल्ली येथील इंग्रजी व हिंदी भाषिक प्रकाशकांना दिले होते. याबाबत राज्यातील मराठी प्रकाशकांनी त्यांच्याविरुद्ध मोठी राळ उठविली होती. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com