ED raids on Baba Siddique | Sarkarnama

'ईडी'च्या छाप्यांमुळे काँग्रेसचे माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकी अडचणीत

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 31 मे 2017

बाबा सिद्दीकी हे बांधकाम व्यवसायात असून 'एसआरए' अंतर्गत घरांच्या गैरव्यवहारप्रकरणी त्यांच्या विरोधात तक्रारी दाखल झाल्या होत्या. सिद्दीकी हे 2004 ते 2008 या काळात अन्न व नागरी पुरवठा खात्याचे राज्यमंत्री होते.

मुंबई - काँगेसचे माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकी यांच्या कार्यालयावर बुधवारी 'ईडी'च्या अधिकाऱ्यांनी मुंबईत पाच ठिकाणी एकाच वेळी धाडी टाकून चौकशी सुरू केल्याचे समजते. या छाप्यांमुळे बाबा सिद्दीकी अडचणीत आले आहेत.      

मुंबईतील  सिनेतारकांचे वास्तव्य आणि उच्चभ्रू वस्तीचा भाग म्हणून ओळखला जाणाऱ्या वांद्रे परिसरात बॉलिवूड स्टार सलमान खान आणि शाहरुख खान यांना एकाच व्यासपीठावर आणण्याचे काम बाबा सिद्दीकी यांनी यापूर्वी केले आहे . पूर्वीच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे त्यांना अनेक समाजकंटकांकडून आणि अंडरवर्ल्ड कडूनही धमक्या आलेल्या आहेत.

बाबा सिद्दीकी हे बांधकाम व्यवसायात असून 'एसआरए' अंतर्गत घरांच्या गैरव्यवहारप्रकरणी त्यांच्या विरोधात तक्रारी दाखल झाल्या होत्या. सिद्दीकी हे 2004 ते 2008 या काळात अन्न व नागरी पुरवठा खात्याचे राज्यमंत्री होते. तर 2000 ते 2004 या काळात म्हाडा दुरुस्ती महामंडळाचे अध्यक्ष होते. वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघात 2014 मध्ये भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी सिद्दीकी यांना पराभूत केले होते

संबंधित लेख