खासदार सुजय विखे आणि सदाशिव लोखंडे यांना निवडणूक आयोगाची तंबी

खासदार सुजय विखे आणि सदाशिव लोखंडे यांना निवडणूक आयोगाची तंबी

नगर : लोकसभा निवडणुकीत उमेदवारींनी निवडणुकीनंतर एक महिन्यांच्या आत निवडणूक खर्च सादर करणे आवश्यक असताना अहमदनगर व शिर्डी या दोन्ही मतदारसंघातील ३९ उमेदवारांनी हा खर्च सादर केला नाही.

त्यामुळे त्यांना २२ जूनची मदत दिली असून, तोपर्यंत खर्च दाखल झाला नाही, तर विजयी उमेदवार खासदार डाॅ. सुजय विखे पाटील व सदाशिव लोखंडे यांना खासदारकी गमावण्याची तंबी निवडणूक आयोगाने दिली आहे.

नगर व शिर्डी लोकसभा मतदारसंघातील उमेदवाराचा खर्च तपासणीसाठी निवडणूक विभागाने स्वतंत्र कक्ष स्थापन केला होता. यामध्ये उमेदवारांना ७० लाखांची खर्चाची मर्यादा दिली होती. तथापि, अहमदनगर मतदारसंघातील खासदार डाॅ. सुजय विखे पाटील यांच्यासह १९ उमेदवार तसेच शिर्डी लोकसभा मतदारसंघातील खासदार सदाशिव लोखंडे यांच्यासह २० उमेदवारांनी संपूर्ण खर्च सादर केलेला नाही.

यापूर्वी १८ एप्रिलपर्य़ंतचा खर्च सादर केलेला आहे. त्यानुसार खासदार डाॅ. विखे यांनी ५१ लाख ८९ हजार २८९ असा खर्च सादर केला आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांनी ४२ लाख ४० हजार ८४६ असा खर्च सादर करण्यात आला आहे. शिर्डी मतदारसंघातील खासदार सदाशिव लोखंडे यांनी २४ लाख ८३ हजार ४९८ असा खर्च सादर केला, तर काॅंग्रेसचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांनी ३ लाख ८४ हजार ३३९ रुपये असा खर्च सादर केला आहे. या सर्व उमेदवारांना आता मुदतवाढ दिली असून, २२ जूनपर्य़ंत संपूर्ण खर्च सादर करण्याचे बजावले आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com