ec bans speech of mayawati and aditynarh | Sarkarnama

मायावती, योगी आदित्यनाथ यांची `बोलती बंद`

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 15 एप्रिल 2019

नवी दिल्ली : धार्मिक द्वेष पसरविणारी भाषा निवडणूक प्रचारात वापरल्याबद्दल निवडणूक आयोगाने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि बहुजन समाज पार्टीच्या सर्वेसर्वा मायावती यांच्यावर अखेर कारवाई केली आहे. आदर्श अचारसंहितेचे उल्लंघन केल्या प्रकरणी आयोगाने योगी आदित्यनाथ यांना ७२ तासांसाठी तर मायावती यांना ४८ तासांसाठी भाषणबंदी करण्यात केली आहे.

त्यांच्या वादग्रस्त भाषणाबद्दल सर्वोच्च न्यायालयात तक्रार करण्यात आली होती. या दोघांवर काय कारवाई केली, अशी विचारणा सरन्यायाधीश रंजन गगोई यांनी केल्यानंतर आम्ही दोघांना नोटीस पाठविल्याची सारवासारव निवडणूक आयोगाने केली. तसेच आम्हाला कारवाईचे अधिकार नसल्याचे आयोगाने सांगितले. त्यावर चिडलेल्या न्यायालायने तुम्हाला तुमच्या अधिकारांची जाणीव नाही, असे फटकारून पुढील 24 तासांत काय कारवाई केली, याची माहिती न्यायालायला द्या, असा आदेश दिला.

त्यानंतर आयोगाने तातडीने हालचाली करून या दोघांच्या भाषणांवर काही कालावधीसाठी बंदी घातली.   त्यामुळे योगी पुढचे तीन दिवस तर मायवती दोन दिवस आपआपल्या पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करु शकणार नाहीत. उद्या सकाळी म्हणजे १६ एप्रिल सकाळीसहा वाजल्यापासून ही प्रचारबंदी अंमलात येणार आहे.  
मायावती यांना एका प्रचारसभेत मुस्लिमांना आपले मत वाया जाऊ न देण्याविषयी आवाहन केले होते. मुस्लिमांनी आपले मत काॅंग्रेसला देण्यापेक्षा थेट सप-बसप युतीला द्यावे, असे त्यांनी सांगितले.

आदित्यनाथ यांनी त्यांच्याकडे (बस-बसपकडे) अली आहे तर आमच्याकडे बजरंग बली आहे, असे सांगत त्यांनी धार्मिक भावना पेटविण्याचा प्रयत्न केल्याचे आयोगाने बजावलेल्या नोटिशीत म्हटले आहे.

संबंधित लेख