eaknath khadase | Sarkarnama

एकनाथ खडसेंच्या सत्काराचे रहस्य काय ?

अरुण जैन
सोमवार, 4 सप्टेंबर 2017

बुलडाणा : भाजपचे राज्यातील मातब्बर नेते माजी महसूल मंत्री तथा बुलडाणा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री एकनाथराव खडसे यांचा जंगी सत्कार सोहळा नुकताच मलकापूरात पार पडला. एकनाथरावांचा वाढदिवस दरवर्षीच येतो मात्र, एवढ्या मोठ्या प्रमाणात सत्कार सोहळा यावर्षीच का झाला असावा? या प्रश्‍नाने अनेकांच्या राजकीय भुवया उंचावल्या आहेत. 

बुलडाणा : भाजपचे राज्यातील मातब्बर नेते माजी महसूल मंत्री तथा बुलडाणा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री एकनाथराव खडसे यांचा जंगी सत्कार सोहळा नुकताच मलकापूरात पार पडला. एकनाथरावांचा वाढदिवस दरवर्षीच येतो मात्र, एवढ्या मोठ्या प्रमाणात सत्कार सोहळा यावर्षीच का झाला असावा? या प्रश्‍नाने अनेकांच्या राजकीय भुवया उंचावल्या आहेत. 

युध्दात, प्रेमात आणि आता राजकारणात सर्वकाही चालते असे म्हटले जाते. राज्यात मुख्यमंत्र्यांच्या तोडीचे मंत्री म्हणून एकनाथ खडसे यांचे वजन आहे. काही गैरव्यवहारांच्या प्रकरणांवरुन एकनाथरावांचे मंत्रीपद गेले. मात्र त्यांचे वजन आणि दबदबा आजही कायम आहे. त्यांचा वाढदिवस दरवर्षी येतो परंतू यावर्षी तो विशेष करुन गाजला मलकापूरातील त्यांच्या नागरी सत्कारामुळे. 

महसूलमंत्री असतांनाही त्यांचा वाढदिवस इतक्‍या दणक्‍यात साजरा झाला नाही. मग यावर्षीच का? असा प्रश्‍न अनेकांना पडणे स्वाभाविक आहे. मध्यंतरीच्या प्रकरणानंतर सध्या कुठे गेल्या महिना दोन महिन्यात एकनाथरावांची पुन्हा मंत्रीपदी एन्ट्री होवू शकते असे वातावरण तयार होवू लागले आहे. मुख्यमंत्री व वरिष्ठ गोटातही त्यांची वर्दळ वाढली आहे. आता नुकताच केंद्रीय मंत्रीमंडळाचा विस्तार झाला. या पाठोपाठ महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचाही विस्तार होवू शकतो. त्यामध्ये एकनाथरावांचे पुनरागमन होण्याची दाट शक्‍यता आहे. 

त्यांचे मुळे गांव मुक्ताईनगर हे मलकापूर पासून जवळच आहे. नांदूरा, मोताळा, बुलडाणा, मलकापूर या भागाशी त्यांचा अगदी निकटचा संबंध आहे. शिवाय एकनाथरावांच्या काळात भातृमंडळाच्या माध्यमातून सामाजिक कामांना मोठी चालना मिळाली. शिवाय त्यांचे अनेक कार्यकर्ते त्या काळात त्यांच्यावर खुश होते मग अशावेळी भाऊ पुन्हा मंत्री झाले तर त्यापासून निश्‍चितच आपल्याला किंवा समाजाला फायदा होईल अशी कार्यकर्त्यांची भावना असणे सहाजीक आहे. त्यातच भाऊ गेल्या अनेक दिवसांपासून मंत्रिपदापासून दुर असल्याने त्यांच्या प्रती अनेकांना बऱ्यापैकी सहानुभती आहे. या सत्कार सोहळ्याच्या माध्यमातून आपल्या भावी काळातील मंत्र्याशी जवळीक वाढू शकते. 

यातून काही सामाजीक, वैयक्तीक कामेही करता येतील अशी भूमिका या सत्कारामागे असावी असा सुर व्यक्त होत आहे. या सोहळ्याला राज्याचे कृषीमंत्री भाऊसाहेब फुंडकर, प्रदेश सचिव आमदार डॉ. संजय कुटे, आमदार चैनसुख संचेती, जिल्हाध्यक्ष धृपतराव सावळे, बुलडाण्याचे विधानसभा क्षेत्रप्रमुख योगेंद्र गोडे यांच्यासह भाजपच्या संघटनात्मक पातळीवरील सर्वच नेत्यांनी हजेरी लावली. यातून नाथाभाऊंची क्रेझ अजुनही कायम असल्याचेच दाखवून देण्याचा हा खटाटोप असावा असा अंदाजही व्यक्त होत आहे. 

संबंधित लेख