गडचिरोलीच काय, घरी पण जाईन; डीवायएसपींचे मुश्रीफांना आव्हान!

नगरसेवक मतदानासाठी येणार असल्याने त्यांची गेटवर ओळखपत्र तपासणी पोलीस उपअधीक्षक सुरज गुरव करत होते. त्याला राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीचे नेते राज्याचे माजी कामगारमंत्री आमदार हसन मुश्रीफ यांनी हरकत घेतली.
गडचिरोलीच काय, घरी पण जाईन; डीवायएसपींचे मुश्रीफांना आव्हान!

कोल्हापूर : कोल्हापूर महापौर निवडीकडे राज्याचे लक्ष लागले असून अनेक नाट्यपूर्ण घडमोडी महापालिकेत सुरु आहेत. महापौर निवडीच्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेला पोलीस छावणीचे स्वरुप प्राप्त झाले आहे. यातच नगरसेवक मतदानासाठी येणार असल्याने त्यांची गेटवर ओळखपत्र तपासणी पोलीस उपअधीक्षक सुरज गुरव करत होते. त्याला राष्ट्रवादीचे नेते,  आमदार हसन मुश्रीफ यांनी हरकत घेतली. 

त्यामुळे भडकलेल्या नेत्यांनी गुरव यांना गडचिरोलीची हवा दाखवण्याचा इशारा दिला. मात्र या धमकीला न घाबरता गुरव यांनी, 'गडचिरोलीच काय पण घरात बसेन, मात्र तुम्हाला आत सोडणार नाही,' अशा शब्दात प्रतिआव्हान दिल्याने महापालिकेच्या बाहेरचे वातावरणही चांगलेच तापले. 

कोल्हापूर महापलिकेची आज महापौर निवड आहे. महापालिकेवर काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता आहे. मात्र यावेळी महापौर पद भाजपकडे घेण्यासाठी मोठी ताकत लावण्यात आली आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे संख्याबळ 44 इतके आहे. यातील दोन नगरसेवकांनी पक्षविरोधी भूमिका घेतल्याने त्यांना अपात्र करण्यात आले आहे. तर जात पडताळणीवरुन आणखी चार नगरसेवकांना अपात्र करण्यासाठी कोल्हापूर पासून मंत्रालयापर्यंत भाजपची यंत्रणा काम करत आहे. हे चार नगरसेवक अपात्र झाल्यास काँग्रेस राष्ट्रवादीचे संख्याबळ 38 इतके होणार आहे. सध्या भाजपकडे 33 नगरसेवक आहेत. 

यातील एक अपात्र ठरल्यास त्यांचे संख्याबळ 32 इतके होणार आहे. काँग्रेस राष्ट्रवादीची शिवसेनेशी युती आहे. युतीचे 4 नगरसेवक आहेत. मात्र त्यांनी तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला आहे. असे झाल्यास काँग्रेस राष्ट्रवादी 34 तर भाजप-ताराराणी आघाडीचे संख्याबळ 36 इतके होणार आहे.

महापौर निवडीत काहीही घडेल अशी शक्यता असल्याने व कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता असल्याने मोट्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. महापालिका प्रवेश द्वारावर ओळख पत्र तपासण्याचे काम पोलीस उपअधीक्षक सुरज गुरव करत होते. मात्र त्याला आमदार मुश्रीफ यांनी हरकत घेतली. महापालिकेत प्रवेश द्या तेथील यंत्रणा तपासण्याचे काम करेल, असे त्यांनी सांगितले. मात्र, गुरव यांनी तसे करण्यास नकार दिला. यावरून वादावादी झाली.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com