dy patil and mahadik | Sarkarnama

पाटील यांच्या प्रवेशामुळे धनंजय महाडिक यांच्या खेळीबद्दल कोल्हापुरात उत्सुकता

सदानंद पाटील
रविवार, 23 डिसेंबर 2018

कोल्हापूर : बिहारचे माजी राज्यपाल, शिक्षण महर्षी डॉक्‍टर डॉ. डी .वाय. पाटील यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील प्रवेशाने राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. पाटील यांच्या पक्ष प्रवेशाने कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासह जिल्ह्याचे राजकारण बदलण्याचे संकेत मिळाले आहेत. खासदार धनंजय महाडिक यांना रोखण्यासाठी ही योजना असण्याची शक्‍यताही व्यक्त होत आहे. पाटील यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसने कोल्हापूरची उमेदवारी दिली तर खासदार महाडिक काय करतील ? भाजप मध्ये प्रवेश करणार की अपक्ष उमेदवार लढणार, याची चर्चा लगेच सुरू झाली आहे. 

पाटील हे कॉंग्रेसचे एकेकाळचे कट्टर कार्यकर्ते. कोल्हापूरचे महापौर, पन्हाळा बावडाचे आमदार ते बिहारचे राज्यपाल असा त्यांचा प्रवास राहिला आहे. देशातील विविध राजकीय पक्षामधील नेत्यांशी त्यांचे घनिष्ठ संबंध आहेत. आमदार सतेज पाटील जे डॉ. डी. वाय. पाटील यांचे सुपुत्र, त्यांना कॉंग्रेस पक्षाने गृहराज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी दिली होती. 

आमदार पाटील हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार धनंजय महाडिक यांचे कट्टर विरोधक. आमदार पाटील यांनी मागील लोकसभा निवडणुकीत खासदार महाडिक यांचा प्रचार केला होता. पाटील - महाडिक वादात आमदार हसन मुश्रीफ यांनी मध्यस्थी केली होती. मात्र लगेच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाडिक यांनी सतेज पाटील यांचे विरुद्ध भाजपमधून लढणाऱ्या चुलत बंधू अमल महाडिक यांच्या मागे आपली ताकत उभी केली. मागील विधानसभा निवडणुकीपासून पाटील आणि महाडिक टोकाचा संघर्ष सुरू आहे. 

महाडिक याना उमेदवारी मिळू नये म्हणून पाटील यांनी अनेक खेळ्या केल्या. कॉंग्रेस निर्धार यात्रेत आमदार पाटील यांनी थेट कोल्हापूर लोकसभेची जागा कॉंग्रेस पक्षाला मागत महाडिक यांना धक्का दिला. कॉंग्रेस मधून सतेज पाटील यांनी तर राष्ट्रवादी कॉंग्रेस मधून आमदार हसन मुश्रीफ यांनी महाडिक यांच्या उमेदवारीला आव्हान दिले. मात्र महाडिक याना पर्याय कोण? असा प्रश्न निर्माण झाला. मुश्रीफ व पाटील यांची मदार ही शिवसेनेच्या संजय मंडलिक यांच्यावर होती. मात्र मंडलिक हे सेना सोडण्यास तयार नाहीत आणि दुसरा पर्याय नसल्याने महाडिक यांचे पारडे जड वाटत होते. 

राष्ट्रवादी कॉंग्रेस कडून उमेदवारी मिळाली तरी आपण सतेज पाटील यांच्या घरी जाणार नसल्याची घोषणा महाडिक यांनी केली होती. त्यानंतर खासदार शरद पवार यांनी महाडिक यांची संसदीय उपनेते म्हणून निवड केल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पारडे महाडिक यांच्या बाजूने झुकल्याचे चित्र होते. मात्र आज राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये डॉ डी वाय पाटील यांच्या प्रवेशाने महाडिक यांची उमेदवारी अडचणीत आली आहे. डॉ डी वाय पाटील यांचा सध्या फक्त प्रवेश झाला आहे. अजून डॉ पाटील हे लोकसभा निवडणूक लढणार का, हे अजून निश्‍चित झाले नसले तरी वाटचाल मात्र त्याच दिशेने सुरू असून महाडिक आता काय चाल करणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. 

संबंधित लेख