DY Patil Accepted Primary Membership of NCP | Sarkarnama

डाॅ. डी. वाय. पाटील यांनी हातावर बांधले राष्ट्रवादीचे घड्याळ

सरकारनामा ब्युरो
रविवार, 23 डिसेंबर 2018

बिहारचे माजी राज्यपाल व काँग्रेस नेते  डॉ. डी. वाय.पाटील यांनी आज पुण्यामध्ये अधिकृतपणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सदस्यत्व स्वीकारले. त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने कोल्हापूरमधील राजकारणाने वेगळे वळण घेतले आहे. लवकरच  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष  शरद पवार यांच्या उपस्थितीत त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश होणार आहेत.

पुणे : बिहारचे माजी राज्यपाल व काँग्रेस नेते  डॉ. डी. वाय.पाटील यांनी आज पुण्यामध्ये अधिकृतपणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सदस्यत्व स्वीकारले. त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने कोल्हापूरमधील राजकारणाने वेगळे वळण घेतले आहे. लवकरच  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष  शरद पवार यांच्या उपस्थितीत त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश होणार आहेत.

डी. वाय. पाटील यांचे पूत्र व माजी गृहराज्य मंत्री सतेज पाटील हे काँग्रेसचे आमदार आहेत. सतेज पाटील यांचे राजकारणातले कट्टर शत्रू धनंजय महाडिक राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आहेत. धनंजय महाडिक यांनी 2014 मध्ये विधानसभेच्या निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवणारे अमल महाडिक यांचा प्रचार केला होता. त्या निवडणुकीत सतेज पाटील यांना पराभूत व्हावे लागले होते. आता डी. वाय. पाटील यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने कोल्हापूरच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. कोल्हापूरचे राजकारण आता कुठल्या दिशेने वळण घेते याकडे राजकीय निरिक्षकांचे लक्ष लागले आहे. 

संबंधित लेख