"" दुबार पेरणीसाठी मोफत खते, बियाणे द्या '' 

"" दुबार पेरणीसाठी मोफत खते, बियाणे द्या '' 

मुंबई : पावसाने दडी मारल्यामुळे राज्यातील 12 जिल्ह्यांमध्ये दुबार पेरणीची भीती निर्माण झाली असून, सरकारने दुबार पेरणीकरिता शेतकऱ्यांना मोफत खते, बियाणे व पतपुरवठ्यासंदर्भात मदत करण्याची तयारी सुरू करावी, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. 

राज्यातील पेरणीच्या परिस्थितीसंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना विखे पाटील म्हणाले की, राज्याच्या कृषिमंत्र्यांनीही 2 दिवसात पाऊस न आल्यास 12 जिल्ह्यात दुबार पेरणीची वेळ ओढवू शकते, यास पुष्टी दिली आहे. परंतु, सरकारने पाऊस येतो की नाही, याची प्रतीक्षा करण्याऐवजी दुबार पेरणीचे संकट ओढवू शकते, असे गृहित धरून तातडीने पूर्वतयारी सुरू करण्याची गरज आहे. 

कॉंग्रेस आघाडी सरकारच्या काळात मी कृषिमंत्री असताना शेतकऱ्यांच्या थेट बांधावर खते पोहोचवली होती. कृषि विभागाच्या कार्यालयांमधून मोफत बियाण्यांची व्यवस्था केली असल्याची आठवणही विखे पाटील यांनी करून दिली. 

विखे पाटील म्हणाले, " पीक कर्ज वितरणासंदर्भात तूर्तास मिळणारी माहिती समाधानकारक नाही. जुलैच्या मध्यापर्यंत अनेक बॅंकांनी कर्ज वितरणाचे जेमतेम 50 टक्के उद्दिष्ट गाठल्याची माहिती प्रसार माध्यमांकडून येते आहे. याचाच अर्थ अजूनही बहुतांश शेतकऱ्यांना पेरणीच्या तयारीसाठी भांडवल उपलब्ध झालेले नाही, हे स्पष्ट आहे. 
शेतकरी कर्जमाफीची घोषणा करताना सरकारने पेरणीसाठी 10 हजार रूपयांचे अनुदान देण्याची घोषणा केली होती. परंतु, या योजनेंतर्गत जेमतेम 1 कोटी रूपयांचे वितरण झाल्याची माहिती सरकारी सूत्रांकडून मिळाली असल्याचेही विखे पाटील यांनी सांगितले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com