in drught district no fee | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मराठा समाजाला स्वतंत्र कोट्यातूनच आरक्षण : मुख्यमंत्री
ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण देणार - मुख्यमंत्री
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी स्वतंत्र प्रवर्ग तयार करणार - मुख्यमंत्र्यांची घोषणा

दुष्काळी तालुक्‍यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 5 नोव्हेंबर 2018

मुंबई : राज्य सरकारने जाहीर केलेल्या दुष्काळी तालुक्‍यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ केले आहे. याबाबतचा शासन निर्णय उच्च व तंत्र शिक्षण विभागाने नुकताच प्रसिद्ध केला आहे.

मुंबई : राज्य सरकारने जाहीर केलेल्या दुष्काळी तालुक्‍यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ केले आहे. याबाबतचा शासन निर्णय उच्च व तंत्र शिक्षण विभागाने नुकताच प्रसिद्ध केला आहे.

राज्य सरकारने राज्यातील 151 तालुक्‍यांत दुष्काळी परिस्थिती जाहीर केली आहे. दुष्काळी परिस्थिती जाहीर केल्यानंतर त्याअनुषंगाने दिल्या जाणा-या सवलती जाहीर करण्यासाठी विविध विभागांना निर्णय घ्यावे लागतात. यानुसार राज्यातील टंचाईग्रस्त भागातील विद्यार्थ्यांची विद्यापीठ व परभ्क्षा मंडळे यांची परीक्षा फी माफ करण्याची योजना लागू केली आहे. यामध्ये बिगरकृषी विद्यापीाठांकडून घेण्यात येणा-या परीक्षांचा समावेश आहे.याबाबत उच्च व तंत्र शिक्षण विभागाने शासन निर्णय जारी केला आहे. 

संबंधित लेख