Drought affected 180 Talukas | Sarkarnama

राज्यातील दुष्काळसदृष्य परिस्थिती असलेले 180 तालुके कोणते आहेत ?

सरकारनामा
मंगळवार, 23 ऑक्टोबर 2018

सवलती व उपाययोजना 
महसुलातून सूट, सहकारी कर्जाचे पुनर्गठन, शेती निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषी पंपाच्या चालू बिलामध्ये 33.5 टक्के सूट, शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी, रोहयो अंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता, आवश्‍यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टॅंकरचा वापर व टंचाई जाहीर केलेल्या गावांमध्ये शेतकऱ्यांच्या शेती पंपाची वीज जोडणी खंडित न करणे. 
 

मुंबई :  राज्यातील 180 तालुक्‍यांमध्ये दुष्काळसदृष्य परिस्थिती असल्याचे आज राज्य शासनाने जाहीर केले. दुष्काळसदृष्य परिस्थितीवर उपाय योजना म्हणून या तालुक्‍यांमध्ये आठ विविध सवलतील लागू करण्यात आल्या असून संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना या उपाययोजना राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

सन 2018 च्या खरीप हंगामामध्ये राज्यातील सर्व तालुक्‍यांचे महा मदत संगणक प्रणालीद्वारे दुष्काळी परिस्थितीचे मूल्यांकन करण्यात आले.  180 तालुक्यात  आज दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर करण्यात करण्यात आली आहे . 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, यंदा राज्यात सरासरीच्या 77 टक्के पाऊस पडल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. 180 तालुके हे दुष्काळसदृष्य घोषित केले आहेत. या तालुक्‍यांमधील शेतकरी, विद्यार्थी आदींसाठी आठ विविध प्रकारच्या सवलती लागू करण्यात आल्या आहेत. याचबरोबर राज्यातील परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणीचे काम जवळजवळ पूर्ण करण्यात आले आहे. त्या आधारावर पीक परिस्थितीचे आकलन समोर येत आहे. यानंतर लवकरच केंद्र शासनाचे पथक येऊन राज्यातील संपूर्ण परिस्थितीची पाहणी करणार आहे.

दुष्काळ सदृष्य तालुक्‍यांची यादी

अहमदनगर - जामखेड, कर्जत, नगर, नेवासा, पारनेर, पाथर्डी, राहाता, राहुरी, संगमनेर, शेवगाव, श्रीगोंदा.

औरंगाबाद - औरंगाबाद, गंगापूर, कन्नड, खुलताबाद, पैठण, फुलंब्री, सिल्लोड, सोयगाव, वैजापूर.

जालना - अंबड, बदनापूर, भोकरदन, घनसावंगी, जाफराबाद, जालना, परतूर.

बीड - अंबेजोगाई, आष्टी, बीड, धरुर, गेवराई, केज, माजलगाव, परळी, पातोडा, शिरुर (कासार), वडवणी.

परभणी - मनवत, पालम, परभणी, पाथरी, सेलू, सोनपेठ.

हिंगोली - हिंगोली, कळमनुरी, सेनगाव.

नांदेड - देगलूर, मुखेड, उमरी.

उस्मानाबाद - लोहारा, कळंब, उस्मानाबाद, परांडा, तुळजापूर, वाशी, भूम.

लातूर - शिरुर अनंतपाल.

अकोला - अकोला, बालापूर, बार्शीटाकली, मूर्तीजापूर, तेल्हारा.

अमरावती - अचलपूर, अंजनगाव सुर्जी, चिखलदरा, मोर्शी, वरुड.

भंडारा - लाखणी, मोहाडी, पवनी.

बुलडाणा - खामगाव, लोणार, मलकापूर, मोताळा, नांदूरा, संग्रामपूर, शेगाव, सिंदखेड राजा.

चंद्रपूर - भद्रावती, ब्रम्हपूरी, चंद्रपूर, चिमूर, गोंडपिंपरी, नागभिड, पोंभूर्णा, राजूरा, सिंदेवाही, वरोरा. धुळे जिल्हा - धुळे, शिरपूर, सिंदखेडे.

गोंदिया - देवरी, मोरगाव अर्जूनी, सालेकसा.

नागपूर - कळमेश्वर, काटोल, नरखेड.

वाशिम - रिसोड.

यवतमाळ - बाभूळगाव, दारव्हा, कळंब, केळापूर, महागाव, मोरेगाव, राळेगाव, उमरखेड, यवतमाळ

जळगाव - अमळनेर, भडगाव, भुसावळ, बोदवड, चाळीसगाव, चोपडा, जळगाव, जामनेर, मुक्ताईनगर (एदलाबाद), पाचोरा, पारोळा, रावेर, यावल.

नंदुरबार - नंदुरबार, नवापूर, शहादा, तळोदे.

नाशिक - बागलाण, चांदवड, देवला, इगतपूरी, मालेगाव, नांदगाव, नाशिक, सिन्नर.

पालघर - पालघर, तलासरी, विक्रमगड.

पुणे - आंबेगाव (घोडेगाव), बारामती, भोर, दौंड, हवेली, इंदापूर, मुळशी पौड, पुरंदर सासवड, शिरुर घोडनदी, वेल्हे.
रायगड - माणगाव, श्रीवर्धन, सुधागड.

रत्नागिरी - मंडणगड, आटपाडी, जत, कडेगाव, कवठेमहांकाळ, खानापूर विटा, पलूस, तासगाव.

सातारा - कराड, खंडाळा, कोरेगाव, माण दहीवाडी, फलटण, वाई.

सांगली - आटपाडी, पलूस, कवठेमहांकाळ, जत, खानापूर विटा
सिंधुदुर्ग - वैभववाडी.

कोल्हापूर - बावडा, हातकणंगले, कागल, राधानगरी.

सोलापूर - अक्कलकोट, करमाळा, माढा, माळशिरस, मंगळवेढे, मोहोळ, पंढरपूर, सांगोले, दक्षिण सोलापूर.
वर्धा - आष्टी, कारंजा, समुद्रापूर.

संबंधित लेख