dron bjp news mumbai | Sarkarnama

मंत्रालय सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवून भाजप पक्षप्रवेश कार्यक्रम ? 

ब्रह्मा चट्टे 
गुरुवार, 28 सप्टेंबर 2017

मुंबई : भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यालयात धुळे येथील शिवसेना कार्यकर्त्याचा भाजप प्रवेश धुमधडाक्‍यात करण्यात आला. या कार्यक्रमाला ड्रोन कॅंमेरा वापरल्याचे समोर आल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. मंत्रालय परिसरातच सत्तेचा गैरवापर करत सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवल्याने चर्चेला उधाण आले आहे. 

मुंबई येथे मंत्रालय परिसरात ड्रोन कॅमेराने शूटिंगला परवानगी नाही. मात्र राज्याचे चार कॅबिनेट मंत्र्याच्या उपस्थितीत कार्यक्रमाला ड्रोन कॅमेराला विरोध कोण करणार ? त्यामुळे राजरोसपणे मंत्रालय सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवून वापर ड्रोन कॅमेऱ्याचा वापर करण्यात आला आहे. यावेळी या कार्यक्रमाला भाजप अध्यक्ष रावसाहेब दानवे, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, पर्यटन मंत्री जयकुमार रावल, सहकार मंत्री सुभाष देशमुख हजर होते. त्यांच्या समोरच ड्रोन कॅंमेऱ्याचा वापर करण्यात आला. 

धुळ्यातील शिवसेना नगरसेवक प्रदीप कर्पे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम मोठ्या धुमधडाक्‍यात करण्यात आला होता. यासाठी खास धुळ्यातून कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले होते. धुळे येथील एस कुमार स्टुडिओचा ड्रोन कॅमेराही मुंबईत आणून शुटींग केली असल्याचू माहिती सुत्रांनी दिली.  
 
संबंधित लेख